मद्रास उच्च न्यायालयाने अभिनेता धनुषने त्याच्या आयात केलेल्या रोल्स रॉयसवरील प्रवेश करातून सूट मागण्याच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी केली.
न्यायालयाने धनुषला 48 तासांच्या आत 30.30 लाख रुपये भरण्याचे निर्देश दिले आहेत.  "दूध विक्रेते आणि रोजंदारीवर काम करणारे देखील प्रत्येक लिटर पेट्रोलवर कर भरतात," अस जज म्हणाले.

धनुष हा साऊथ फिल्म सृष्टीत आघाडीचा अभिनेता आहे. त्याने अनेक हिट चित्रपट दिले असून, कोलावरी डी या गाण्यापासून तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता.