भारत-इंग्लंड कसोटी मालिकेमध्ये सर्वांच्या नजरा रिषभ पंतवरलागल्या आहेत.  इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आता पंतचे कौतुक केले आहे. 
'पंतने माझ्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप लगावला होता, असे करताना तुम्ही कधी गांगुलीला ही पाहिले नसेल, आयपीएलच्या पिढीतील हे खेळाडू आहेत, ते क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात, कोणताही फटका खेळण्यास घाबरत नाही, असे अँडरसनने यावेळी म्हटले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. 
INDIA VS ENGLAND TEST SERIES TIMETABLE पाहा वेळापत्रक - 
* पहिला कसोटी सामना- 4 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट
* दुसरा कसोटी सामना- 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 
* तिसरा कसोटी सामना- 25 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट
* चौथा कसोटी सामना- 2 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर
* पाचवा कसोटी सामना- 10 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर