लिओनल मेस्सी तब्बल 17 वर्ष, 778 सामने, 672 गोल्स आणि 35 चषक मिळवून दिल्यानंतर बार्सिलोनासोबतचा करार संपुष्टात आला आहे.
▪️ केवळ 13 वर्षांचा असताना बार्सिलोना संघाकडून खेळू लागलेल्या लिओनल मेस्सीने आज स्पॅनिश क्लब बार्सिलोना सोडण्याचा निर्णय घेतला. ही माहीती बार्सिलोना क्लबने त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन दिली.
बार्सिलोना क्लबने त्यांच्या अधिकृत ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, ‘मेस्सीचे क्लबसोबतचा करार संपला असून आता नवीन करार तयार करण्यात येत होता.
▪️मात्र क्लब आणि खेळाडू यांच्यामध्ये नवीन करारातील आर्थिक आणि संरचनात्मक अडथळ्यांमुळे हा करार होऊ शकला नाही. तर मेस्सी यापुढे संघाकडून खेळणार नाही. सोबतच संघाने मेस्सीला त्याच्या पुढील वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनासाठीही शुभेच्छा दिल्या आहेत.