जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

Naxal Attack: छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यामध्ये दोन जवान शहीद

छत्तीसगड राज्यातील नारायणपूर येथे नक्षलवाद्यांकडून घडवून आणलेल्या हल्ल्यामध्ये इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस म्हणजेच ITBP चे दोन जवान शहीद झाले. नक्षलवद्यांनी कडेमेटा कॅम्पजवळ ६०० मीटर अंतरावर जवानांवर हल्ला केला. तर नक्षलवाद्यांनी या हल्ल्यानंतर जवानांची शस्रही लुटून नेल्याची माहिती मिळत आहे.


शहीद जवान हे ITBP च्या 45 व्या बटालियनचे  जवान आहेत. बस्तरचे महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी या घटनेची माहिती देत शहीद दोन जवानांमध्ये एका ASI आणि एका असिस्टंट कमांडन्टचा समावेश असल्याचे सांगितले.

 हा हल्ला करून नक्षलवाद्यांनी जवानांची 1 AK 47 रायफल, 2 बुलेटप्रुफ जॅकेट आणि वॉकी टॉकी लुटून नेले आहेत.

नारायणपूर जिल्ह्याच्या कडेनार आणि करियामेटा दरम्यान बेचा गावाजवळ ही घटना घडली असल्याचे  सांगितले जात आहे. सर्च ऑपरेशनवर जात असलेल्या ITBPच्या जवानांवर नक्षलवाद्यांनी अॅम्ब्युश (घात) लावून हल्ला केला असल्याची माहिती मिळत आहे.
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या