पोलंडची 25 वर्षीय भालाफेक मारिया आंद्रेजिकने एका 8 महिन्यांच्या बाळाच्या उपचारासाठी अलीकडेच झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमधील जिंकलेल्या रौप्य पदकाचा लिलाव करत सर्वांचं हृदय जिंकलं.


ती स्वतः हाडांच्या कर्करोगाची शिकार होती त्यातून बरे झालेल्या मारियाने हे पदक 8 महिन्याच्या मालोस्ज मालिसा नावाच्या बाळासाठी लिलाव केले. तर हे पदक जाबका स्टोरने खरेदी केले असून हे पदक त्यांनी न घेता त्याची देखरेख मारियाने करावे असे सांगितले. हे पदक 200,000 जलोटीस म्हणजेच 50 हजार अमेरिकन डॉलरची किंमत मिळाल्याची माहिती मिळत आहे.