IDC वर्ल्डवाइड क्वार्टरली मोबाईल फोन ट्रॅकरच्या अहवालानुसार, 2021 हे वर्ष स्मार्टफोन निर्माती कंपनी पोकोसाठी एक उत्तम वर्ष आहे, POCO कंपनीने 2021 च्या दुसऱ्या तिमाहीत 865% वाढ दर्शवली आहे.  तर या वर्षीच्या पहिल्या तिमाहीमध्ये पोको कंपनीने 300% वाढीची घोषणा केली होती. पोको ही स्मार्टफोन निर्मिती करणारी कम्पनी भारतीय बाजारपेठेत वेगाने वाढणारी कंपनी बनली आहे.  कंपनीकडे बजेट पासून मिड-रेंज सेगमेंटमध्ये अनेक उत्तम स्मार्टफोन आहेत, चला तर पाहूया ते 3 स्मार्टफोन कोणते आहेत ज्यांची विक्री विक्रम मोडत आहे.

Poco mobile in india


हे 3 स्मार्टफोन 2021 मध्ये वर्चस्व गाजव आहेत

भारतीय बाजारपेठेत कंपनीच्या Poco M3, Poco X3 Pro आणि Poco C3 सारखे स्मार्टफोन विक्रीच्या बाबतीत सर्वाधिक विक्री नोंदवले आहेत.  पोको ब्रँडने 2021 च्या पहिल्या सहामाहीत म्हणजेच 6 महिन्यांत या स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री केली आहे.

यामध्ये सर्वात स्वस्त आणि परवडणारा फोन आहे Poco C3 जो गेल्या वर्षी लाँच करण्यात आला होता आणि लॉन्च झाल्यानंतर 9 महिन्यांत फोनच्या 2 दशलक्ष युनिट्सची विक्री झाली आहे. भारतामध्ये Poco C3 या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायच तर हा फोन फ्लिपकार्टवर 7,999 रुपयांना मिळतो तर ही किंमत 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे.

Poco X30 Pro Price in India

शिवाय, Poco X3 Pro हा एक मिड-रेंज सेगमेंट स्मार्टफोन आहे जो स्नॅपड्रॅगन 860 प्रोसेसर आणि 33W फास्ट चार्जिंगसह 5160 mAh ची शक्तिशाली बॅटरी सह येतो. तसेच यात फोटोग्राफीसाठी 48 मेगापिक्सलचा क्वाड रियर कॅमेरा सेटअप देखील मिळत आहे.

Poco X3 Pro च्या किंमतीबद्दल बोलायच तर 6 GB RAM आणि 128 GB स्टोरेज असलेल्या या Poco स्मार्टफोनच्या व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे. तर, या फोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट साठी 20,999 रुपये मोजावे लागतील.

POCO M3 Information In Marathi

 Poco M3 या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायच तर 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 10,499 रुपये आहे, तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे.

काही खास फिचर्सबद्दल बोलायच तर हँडसेटमध्ये 6000mAh ची  बॅटरी, स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर, 48-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा आणि फुल-HD + डिस्प्ले देण्यात आला आहे.