जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

गणेश चतुर्थी का साजरी केली जाते, त्यामागे अशी आहे आख्यायिका....

 आपल्या लाडक्या बाप्पांचे सण आता आले आहे.

भाद्रपद महिन्यातील पक्षाची गणेश चतुर्थी सर्वजणच खूप उत्साहात साजरी करत असतात. सर्वात आवडीचा सण म्हणून गणेश चतुर्थी उत्सव साजरा केला जातो.

या दिवसाचे अनेक वैशिष्ट्य आहे. त्यामध्ये या दिवशी गणपतीचा जन्म झाला म्हणून गणेश चतुर्थी संपूर्ण देशभरात मोठ्या थाटामाटात आरंभला जातो.

गणेश चतुर्थी गणेश पूजा का साजरी केली जाते यामागे अनेक पौराणिक कथा आहेत त्यापैकी आज एक कथा जाणून घेऊया.


पौराणिक काळात एकदा महर्षी वेदव्यास यांनी महाभारत रचण्यासाठी गणेशाचे आव्हान केले. आणि त्यांना महाभारत लिहिण्यासाठी विनंती केली होती. पण त्यावेळी गणेश जी म्हणाले की," जेव्हा मी लिहायला सुरुवात करेल तेव्हा मी पॅन थांबवणार नाही आणि जर पेन थांबले तर मी लिहायला थांबवेन."

तेव्हा महर्षी वेदव्यास जी म्हणाले," हे गणेशा, तुम्ही विद्वानांमध्ये एक आहात आणि मी एक सामान्य ऋषी आहेत कोणत्याही श्लोकात त्रुटी असू शकते म्हणून मी आधी त्रुटी काढतो आणि त्रुटींचे निवारण केल्यानंतरच श्लोक लिहा."

त्या नंतर व्यास जी श्लोक पाठ करायला सुरुवात केली आणि गणेशजी महाभारत लिहायला सुरुवात केले.

 १० दिवसांनी अनंत चतुर्थीला लेखनाचे काम समाप्त झाले. आणि या दहा दिवसात गणपती बाप्पा त्याच आसनावर बसून महाभारत लिहीत राहिले याचे परिणाम असे झाले की त्यांचे शरीर जड झाले आणि शरीरावर धूळ आणि काहीसा मातीचा थर जमा झाला. नंतर दहा दिवसांनी गणेश यांनी सरस्वती नदीत स्नान केले .स्वच्छ केले शरीरावर बसलेले धूळ घाण जाण्यासाठी स्नान केले.

ज्या दिवशी वेदव्यासांनी बाप्पांना महाभारत लिहिण्यासाठी विनंती केली आणि गणेश जी ते मान्य करून महाभारत लिहिण्यास सुरुवात केली तो दिवस भद्र मासाच्या शुक्ल पक्षाचे तृतीया तिथी होती .यामुळे दरवर्षी या तारखेला गणेशजींची स्थापना केली जाते .आणि दहा दिवस मन, वचन ,कर्म आणि भक्तीने त्यांची पूजा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला त्यांचे विसर्जन केले जाते.

या सणाचे अध्यात्मिक महत्त्व असे आहे की, आपण दहा दिवस संयमाने जगले पाहिजे आणि त्यानंतर आपल्या मनावर आणि आत्म्यावर स्थिरावलेल्या वासनांची दहा दिवसानंतर मूर्तीसह नकारात्मकता विसर्जित करून शुद्ध मनाचे स्वरूप आणि आत्मा प्राप्त करावा.

व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या