Phone Pay App: फोन पे या मोबाईल अँप वरून रिचार्ज करण्यासाठी महत्वाची माहिती समोर येत असून ही बातमी मोबाईल रिचार्ज करणाऱ्यांना धक्का देणारी आहे. आता फोन पे अँप वरून रिचार्ज करणाऱ्यांना शुल्क द्यावा लागणार आहे.

फोन पे हे मोबाईल अँप UPI आधारित व्यवहारांसाठी शुल्क घेणारे सुरुवात करणारे भारतातील पहिले अॅप आहे. फोन पे अँप द्वारे आपण रिचार्ज, बिल पेमेंट, इन्शुरन्स हप्ते, मनी ट्रान्सफर, प्लेन आणि रेल्वे तिकीट्स यासारखे भरपूर पेमेंट करण्यासाठी वापर केला जात आहे. मात्र आता कंपनीने रिचार्ज करण्यासाठी शुल्क आकारण्यास सुरवात केली आहे.
फोन पे वर रिचार्ज करण्यासाठी किती असेल शुल्क?
फोन पे कंपनीने सांगितले आहे की, 50 रुपयांपेक्षा कमी रिचार्ज केल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मात्र 50 ते 100 रुपये रिचार्ज केल्यावर 1 रुपये द्यावे लागणार आहेत तर 100 रुपयांच्या रिचार्जवर 2 रुपये शुल्क आकारले जाणार आहेत.
दरम्यान इतर UPI पेमेंट ऍप्स अजून कोणतेही शुल्क आकारत नाहीयेत. अश्याच महत्वाच्या माहितीसाठी जीवन मराठीला फॉलो करा.