Khishyat Hay Ka Nota Lyrics in Marathi| खिशात हाय का नोटा लिरिक्स
भकास गावच झकास पाव्हण
झोकात चालणं ठेचा तर बोलणं रुबाब तुमचा मोठा
पाव्हण खिशात हाय का नोटा... || धृपद ||
बाजीरावाच्या थाटात येता पान मस्तानी फुकट खाता
चोर बाजारी ई ई s चोर जाणतो चोरांच्या वाटा
पाव्हण खिशात हाय का नोटा || 1 ||
आवो इष्काच्या बाजारी राव चालत नाही उधारी
नसेल दमडी खिशात तुमच्या खुशाल इथुनी फुटा फुटा ना
पाव्हण खिशात हाय का नोटा.... || 2 ||
नका रागावू हो मजवरी ही घडीभरची मस्करी
तुम्हीच माझं झालं राजसा नोटाला काय मग तोटा
आता राहू द्या तुमच्या नोटा
राजसा राहू द्या तुमच्या नोटा... || 3 ||
आशा भोसले यांनी गायलेले हे गीत नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटातील असून हे गाणं खूपच ऐकू आहे.
हे गाणं ऐकण्यासाठी येथे क्लिक करू शकता.