महाराष्ट्रमधील सामाजिक, ऐतिहासिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रभावी कार्य करणाऱ्या समाज घडवणाऱ्या महान व्यक्तींच्या जीवनावर आधारित ( Movies based on the lives of great people )तसेच समाजातील विविध विषयांवर आधारित मराठी चित्रपट निर्मिती करणाऱ्यांना सहाय्यक अनुदान म्हणून 50 लाख रुपयांवरून १ कोटी रुपये करण्याचा निर्णय आज सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला आहे. (Grant amount 1 crore for educational Marathi film production?)
आज मंत्रालयात झालेल्या सांस्कृतिक विभागाच्या बैठकीमध्ये महान व्यक्ती आणि सामाजिक जीवनावरील चित्रपटांना अनुदान देण्यासंदर्भात(Regarding subsidizing films) ते बोलत होते. यावेळी त्यांनी अशा चित्रपटांंबाबत लवकरच नवीन धोरण तयार करण्याचे निर्देश ही दिलेले आहेत. यासोबतच महान व्यक्ती यांच्यावर दूरचित्रवाणी मालिका तयार करणाऱ्यांना देखील अनुदान देण्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले की, चित्रपट केवळ मनोरंजन नाही, तर ज्ञान आणि प्रबोधनाचे कामही करत असतो. त्यामुळेच सामाजिक, ऐतिहासिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य केलेल्या आणि ज्यांनी समाज घडविण्यास मोलाचा हातभार लावलेल्या महान व्यक्तींवर चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका निर्मिती(Production of films and television series on great personalities) साठी तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांसाठी सहायक अनुदान देण्यात येणार आहे. समाजाला सुसंस्कारित करणे ही काळाची गरज असून सांस्कृतिक कार्य विभाग यासाठी पुढाकार घेणार असल्याचे मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले.
भारत देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव(Amrit Mahotsav of Freedom) साजरा होत आहे त्यामुळे येणाऱ्या वर्षांमध्ये आशयखन चित्रपट आणि मालिका निर्मिती करण्यात येणार आहे ज्यामुळे नव्या पिढीला यातून प्रेरणा मिळेल.
या योजनेमधून निर्माण झालेल्या मालिकांना व चित्रपटांना व्यावसायिक यश(commercial success for serials and films) उत्तम प्रकारे बॉक्स ऑफिसवर मिळाले पाहिजे. त्यासाठी चित्रपटांचा दर्जा सर्वोत्कृष्ट(Quality of movies is best) पाहिजे चित्रपट व मालिका क्षेत्रातील नावाजलेल्या तज्ञांसोबत सांस्कृतिक कार्य विभागाने कार्य करावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत. येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये सांस्कृतिक कार्य विभागामार्फत अनुदानाच्या विषयातील तपशील ठरवणे धोरण विषयक सूचना तयार करणे आणि विषयांसाठी चित्रपट क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची नेमणूक(Recruitment of experts in the field of film) करण्याची समितीची फेररचना करण्यात येणार आहे. या समितीला कालबद्ध पद्धतीने अहवाल देण्यास सांगण्यात येणार आहे.