प्रजासत्ताक दिननिमित्ताने होणाऱ्या पथसंचलनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर सध्या राजधानी दिल्लीत सुरु आहे. यात राष्ट्रीय सेवा योजनेचे महाराष्ट्रामधील १४ आणि गोव्यातील २ असे १६ विद्यार्थी – विद्यार्थीनी सराव करीत आहेत.

74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीच्या कर्तव्यपथावर होणाऱ्या पतसंंचालनासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना या अंतर्गत सराव शिबिर दिल्ली येथील इंटरनॅशनल युथ होस्टेलमध्ये एक जानेवारीपासून चालू झाले आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने होणारे अपत संचालनात देशभरातील 132 विद्यापीठांमधील 213 शैक्षणिक संस्थांमधून 200 विद्यार्थी विविध टप्प्यातील निवड प्रक्रियेतून सहभागी झाले आहेत. यासाठी पश्चिम पुणे विभागात समावेश असणाऱ्या महाराष्ट्र मधून कर्मश्ये हा सात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि गोव्यामधून प्रत्येकी एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी असे एकूण 16 विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले आहेत अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर संचालक डॉक्टर कमलकुमारकर यांनी दिली.

राष्ट्रीय सेवा योजनेचे हे शिबिर ३१ जानेवारी २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे. यात दररोज सकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत योगासने, बौद्धिकसत्र, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पथसंचलनाचा सराव करण्यात येत, असल्याचे श्री. कमलकुमारकर यांनी सांगितले. १ ते ६ जानेवारीपर्यंत सकाळी व सायंकाळी जवाहरलाल नेहरु स्टेडीयमवर पथसंचलनाचा सराव आला असून ७ ते २३ जानेवारीपर्यंत कर्तव्यपथावर पथसंचलनाचा सराव सुरु असल्याचे पुणे विभागाच्या क्षेत्रिय कार्यालयाचे युवा अधिकारी अजय शिंदे यांनी सांगितले.

१५ जानेवारीला मकरसंक्रांतीचा खास सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्र आणि गोव्यातील विद्यार्थ्यांनी सादर केला. या शिबिरात प्रत्येक राज्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम रोज साजरा केला जातो. महाराष्ट्राचे पथक दररोज राज्याची लोक कला सादर करीत असल्याचे सहभागी विद्यार्थ्यांनी सांगितले.