यंदा चित्र संकल्पनेमध्ये साडेतीन शक्ती पटे आणि स्त्री शक्ती जागर या संकल्पनेची निवड करण्यात आली असून प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये कर्तव्यपथावर होत असलेल्या पथ संचलनाकडे सर्व देशातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. या पत्संचलनामध्ये सहभागी होणारी राज्य आणि मंत्रालय स्वतःच्या परीने उत्तम उत्तम संकल्पना निवडून कलाकार त्या संकल्पनांना मूर्त रूप देतात आणि हुबेहूब साकार करण्याचा प्रयत्न करून पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध करतात.
आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आदिशक्तीचे साडे तीन शक्तीपीठ खूप प्रसिद्ध आहेत या साडेतीन शक्तीपीठांमध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजापूर येथे असलेले तुळजाभवानी मातेचे मंदिर माहूर येथे असलेले रेणुका देवीचे मंदिर आणि वनी चे सप्तशृंगी देवीचे मंदिर या धार्मिक स्थळांचा समावेश यामध्ये आहे. या सर्व देवींचे भव्य आणि तितक्यात सुंदर प्रतिमांचे आणि त्या माध्यमातून स्त्रीकडे असलेल्या सामर्थ्यांचे दर्शन यावेळी देशवासीयांना होणार आहे.
महाराष्ट्राचा चित्ररथ परिपूर्ण करण्याचे काम करत असलेले 30 जण असून राहुल धनसरे यांनी 26 जानेवारी पर्यंत महाराष्ट्राचा चित्ररथ परिपूर्ण करण्याचे काम करत आहेत.
यंदाची संकल्पना, रेखाचित्रे आणि त्रिमितीय प्रतिकृती हे तुषार प्रधान आणि रोशन इंगोले या युवक मूर्तिकार आणि कलादिग्दर्शक यांनी तयार केलेली आहेत.
यांच्यासोबत सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि सांस्कृतिक कार्य संचलनाचे संचालक बिबीशन चौरे व सहकारी यांच्या सहकार्याने हा चित्ररथ आता पूर्णत्वास येणार आहे.