आई ए एस सारखी परीक्षा पास होणं साधी गोष्ट नाही मात्र एका पठ्याने परिस्थितीवर मात करत IAS बनण्याचे स्वप्न पूर्ण केलं आहे. रमेश घोलप असं या उमेदवाराचं नाव आहे. रमेश यांनी त्यांच्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमधून हे यश मिळवलेल आहे.
सध्या आयएएस असणारे रमेश घोलप यांनी 2011 या वर्षी यूपीएससी परीक्षेमध्ये 287 वा क्रमांक मिळवलेला होता. सध्या रमेश घोलप हे झारखंड गढवा या गावचे जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम करतात. तर आयएएस रमेश घोलप हे मूळ सोलापूर जिल्ह्यातील महागाव या गावचे रहिवासी आहेत.
IAS रमेश घोलप यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून हे यश गाठलेला आहे रमेश हे बांगड्या विकत आणि लहानपणी रमेश यांना डाव्या पायाला पोलिओ देखील झाल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होती. तरी देखील आयएएस रमेश घोलप हे या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आईएएस या पदापर्यंत पोहोचलेले आहेत.