NTA म्हणजे नॅशनल टेस्ट एजन्सी लवकरच JEE म्हणजेच जॉईंट इंटरन्स एक्झामिनेशन च्या मुख्य परीक्षा 2023 चा admit card आणि एक्साम सिटी इंटिमेशन स्लीप जारी करेल. जे उमेदवार या परीक्षेला बसणार आहेत त्यांना ही माहिती खूप उपयोगी पडणार आहे. 

उमेदवारांनी जाणून घ्यावं अडमिट कार्ड कस डाउनलोड करता येईल आणि JEE Main Admit Card डाउनलोड केल्यानंतर त्यामधील कोण कोणते डिटेल चेक करावयाचे आहेत. अडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर डाउनलोड करू शकता.
एक्साम सिटी इंटीमेशन स्लीप प्रसिद्ध झाल्यावर उमेदवाराला कळू शकेल की, त्याचा पेपर कोणत्या शहरात आहे? त्याच पेपर असलेलं सेंटर कोणत आहे? 

जेईई मुख्य परीक्षा 2023 दोन भागात आयोजित करण्यात येणार असून पहिला सेशन हा 24 जानेवारी पासून 31 जानेवारी पर्यंत असणार आहे. तर दुसरा सेशन 6 एप्रिल पासून सुरू होऊन 12 एप्रिल पर्यंत होणार आहे.

अडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर उमेदवारांना आमचा सल्ला असेल त्यांनी सर्व माहिती जसे रीपोर्टिंग ची वेळ, डौक्युमेंट चे वेरिफिकेशन, आपले नाव इत्यादी माहिती चेक करावी. जर आपल्या ऍडमिट कार्ड वर काही चूक असतील तर त्याबद्दल NTA ला सूचित करावे. JEE MAIN परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. 

JEE Main 2023 Admit Card Download करण्यासाठी या स्टेप्स करा फॉलो

1 पायरी : सर्वप्रथम jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळ वर जावे.
2 पायरी: होम पेज वर असणाऱ्या सेशन 1 साठी JEE MAIN ADMIT CARD 2023 वर क्लिक करा.
3 पायरी: आपली माहिती भरावे आणि इनरोलमेंट वर क्लिक करा.
4 पायरी: आपले जेईई मेन ऍडमिट कार्ड 2023 दिसेल.
5 पायरी: आता आपले जेईई मेन परीक्षेचे अडमिट कार्ड डाउनलोड करा.

जेईई मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवार जेईई अडवांस परीक्षा देऊ शकतो. ही परीक्षा पास झाल्यावर भारतातील IIT आणि अन्य प्रतिष्ठित कॉलेज मध्ये प्रवेश घेऊ शकता. 4 जून पासून JEE  Advance चे आयोजन सुरू करण्यात येणार आहे.