पाणी हे सजीव सृष्टीसाठी एक महत्त्वाचा घटक आहे. दैनंदिन जीवन जगत असताना पाण्याशिवाय जीवन जगणे शक्यच नाही. मात्र सध्या सुरू असलेल्या पर्यावरणाचा ऱ्हास म्हणजेच पाण्यामध्ये मिक्स होत असलेले घटक पाहता कोणतेही पाणी शुद्ध नाही असे म्हणता येईल.
मात्र पृथ्वीवर एक असे सरोवर आहे जे सर्वात स्वच्छ पाणी असलेलं नैसर्गिक स्त्रोत म्हणून नावारूपास आलेल आहे. जाणून घ्या या स्वच्छ पाण्याच्या नैसर्गिक स्वतःबद्दल सविस्तर
(Blue Lake)
पृथ्वीवर सगळ्यात स्वच्छ पाणी असलेलं हे नैसर्गिक स्त्रोत म्हणजे न्युझीलँड मधील ' ब्ल्यू लेक ' सरोवर होय. ब्ल्यू लेक सरोवरातील पाणी इतके स्वच्छ आहे याच्या तळाशी पडलेले लहान लहान दगड, खडे अगदी स्पष्टपणे आपल्याला पाहता येतात.
येथील स्थानिक माओरी लोक या तलावास पवित्र मानतात त्यामुळे या तलावात कोणालाही पोहण्याची परवानगी नाही तसेच या पाण्याला स्पर्शही केला जात नाही.