प्रथम सत्र परीक्षा वेळापत्रक मराठी 2023-24:
वार शुक्रवार दिनांक 27/10/2023 रोजी इयत्ता पाचवी, सहावी आणि सातवी चा पहिला पेपर मराठी असणार आहे. पाचवी आणि सहावीचा मराठी पेपर हा 40 गुणांचा असून तो सकाळी 11 ते 1 या वेळेत होणार आहे. तर सातवी चा पेपर 11 ते 1:30 या वेळेमध्ये होणार आहे हा पेपर 50 मार्कांचा असणार आहे.
वार शनिवार दिनांक 28/10/2023 रोजी इयत्ता पाचवी, सहावी आणि सातवी चा दुसरा पेपर हिंदी असणार आहे. पाचवी आणि सहावीचा हिंदी पेपर हा 40 गुणांचा असून तो सकाळी 11 ते 1 या वेळेत होणार आहे. तर सातवीचा पेपर 11 ते 1:30 या वेळेमध्ये होणार आहे हा पेपर 50 मार्कांचा असणार आहे.
तिसरा पेपर हा गुरुवारी दिनांक 02/11/2023 रोजी होणार आहे. या दिवशी पाचवी सहावीचा गणित पेपर होणार असून तो 40 गुणांचा असणार आहे. याचा वेळ सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत असणार आहे तर इयत्ता सातवीचा सकाळी 11 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत पेपर असणार आहे यामध्ये सातवीचा पेपर हा 50 गुणांचा आहे.
चौथा पेपर हा शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी होणारा असून या दिवशी पाचवी सहावी सातवी चा इंग्रजी पेपर असणार आहे पाचवी आणि सहावीचा पेपर हा सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत असणार आहे हा पेपर 40 गुणांचा असून इयत्ता 7 चा पेपर सकाळी 11 वाजल्यापासून दीड वाजल्यापर्यंत असणार आहे तर हा पेपर 50 गुणांचा आहे.
पाचवा पेपर हा शनिवारी दिनांक 4 नोव्हेंबर 2023 रोजी असून यामध्ये इयत्ता पाचवीचा परिसर अभ्यास हा पेपर असणार आहे हा पेपर एकूण 40 गुणांसाठी असून सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी एक वाजल्यापर्यंत हा पेपर देता येणार आहे. इयत्ता सहावीचा सकाळी 11:00 वाजल्यापासून दुपारी एक वाजल्यापर्यंत 40 गुणांसाठी सामान्य विज्ञान हा पेपर असणार आहे. तर याच दिवशी सातवीचा सामान्य विज्ञान हा पेपर 50 गुणांचा असणार आहे.
येथे इयत्ता पाचवी चे पेपर संपणार आहेत मात्र सोमवारी 6 नोव्हेंबर 2023 रोजी सहावी आणि सातवीचे पेपर असणार आहेत यामध्ये सकाळी 11:00 वाजल्यापासून ती एक वाजल्यापर्यंत इयत्ता सहावीचा इतिहास नागरीक शास्त्र भूगोल या विषयांवर आधारित 40 गुणांचा पेपर असणार आहे त्यानंतर इयत्ता सातवी चा 11:00 वाजल्यापासून दीड वाजेपर्यंत इतिहास नागरीक शास्त्र भूगोल या विषयांचा 50 गुणांचा पेपर असणार आहे.
प्रथम सत्र परीक्षेचे इयत्ता पाचवी सहावी आणि सातवीचे अशा पद्धतीचे वेळापत्रक असणार आहे यानंतर दिवाळी सुट्टी असण्याची शक्यता आहे.
आम्ही दिलेल्या वेळापत्रकानुसारच पेपर होतील असे नाही प्रत्येक शाळेचे पेपर किंवा प्रत्येक बोर्डानुसार पेपर वेगवेगळ्या दिवशी होण्याची शक्यता आहे त्यामुळे हे अधिकृत वेळापत्रक आहे असे ग्राह्य धरू नये अधिक माहितीसाठी आपल्या शाळेशी संपर्क साधावा.