प्रथम सत्र परीक्षा इयत्ता पाचवी 2023-24
विषय- मराठी 
Pratham Satra Exam 2023-24
Subject- Marathi Class- 5th

प्रश्न 1. अ) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही दोन)

१) बंडूचा स्वभाव कसा होता?

२) डोंगरमापाच्या काय येत आहेत ?

३) ढिगऱ्याखालून किती लोकांना जिवंत काढण्यात आले?

ब) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. (कोणतेही दोन)

१) ...... तुझीच गोडी चाखायाची मज आई.

२) गॅसबत्तीच्या प्रकाशात हिरवागार शालू झागमाग करावा तसं ते ....... चमकत होतं.

3). ...... रंग निळा दया.

प्रश्न 2. (अ) खालीलप्रमाणे शब्दातील शेवटच्या अक्षरापासून कोणतेही नाम लिहून नावांच्या भेड्यांचा खेळ पूर्ण करा.

अमर→ रमा→ मानस→.......→ .......→.......→.......

ब) रिकाम्या जागी कंसातील योग्य सर्वनाम लिहा.

१).........बाजारातून भाजी आणूया. (तुम्ही, आपण, आम्ही)

२) रमेशने ........  मित्रांना वाढदिवसाला बोलावले. (त्याच्या, तिच्या, त्यांच्या)

क) पुढील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. (कोणतेही - २)
१) घाम गाळणे.

२) तत्पर असणे.

३) पोटात घाबरा पडणे.

ड) प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा. जसे दार - टोकदार
(१) वान:-

(२) पणा:-

इ) समानार्थी शब्द लिहा.
१) पुष्प:
२) सदन:

फ) विरुद्धार्थी शब्द लिहा.
१) शांत X ..........२) कळत X .....

प्रश्न ३. अ)खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही - २)
१) प्रत्येक वसाहतीत कोणत्या प्रकारच्या मुंग्या काम करतात ?

२) गाडीवानाला मदत करणारे लोक: 

३) खालील वाक्य कोणत्या पाठातील आहे व ते कोणी कोणास म्हटले आहे ते लिहा. "अगं, या मोबाईलचं काही खरं नाही, त्यापेक्षा पत्र लिही बाईला. कायम आठवणीत राहील त्यांच्या "
पाठ-

कोणी -

कोणास 

(प्रथम सत्र परीक्षा इयत्ता पाचवी विषय मराठी)

ब) खाली कृती पूर्ण करा. (कोणतेही २) -

१) कवितेत पुढील घटकांसाठी आलेले रंग लिहा.

१) राघू

२) कौलारू छप्पर

३) गारवेलची फुले

४) पाऊलवाट

२) जोड्या जुळवा.

'अ' गट.                        'ब' गट
अ) रंगवलेली.                १) गोंडे
आ) शोभिवंत.                २) खोंडे
इ) दुलदुलणारी.              ३) शिंगे
ई) अवखळ.                   ४) वशिंडे

३)माहेर' कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
नदीचे नाव

ओट्यावर मांडलेली वस्तू

दळलेला पदार्थ

लाडू ठेवलेले वस्त्र

(रयत शिक्षण संस्था सातारा प्रथम सत्र परीक्षा 2023 24)


प्रश्न ४. अ) दिलेल्या सूचनेनुसार कृती पूर्ण करा. (कोणत्याही दोन)

१) आकृत्या पूर्ण करा.
अ) अरण्यलिपी' या पाठामध्ये आलेल्या खूर असलेल्या प्राण्यांची नावे-
ब) वाघाच्या ठशांचे वर्णन:
वाघिणीच्या ठशांचे वर्णन:

२) बंडूचा दिनक्रम -

३) खेळाडूसाठी महत्त्वाच्या गोष्टी -

ब) सूचनेनुसार कृती पूर्ण करा. (कोणत्याही दोन)

१) 'वल्हवां र वल्हवा' या कवितेतील मुले काय काय करत आहेत ?
२) नादमय (यमक जुळणाऱ्या) शब्दांच्या २ जोड्या लिहा. जसे-
शब्दांची-रंगांची
१)
२)
३) बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना कसे सजवले जाते ?
प्रश्न 5. खालील उताऱ्याचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते. एक म्हणजे ध्यास आणि दुसरी म्हणजे अभ्यास. शक्ती आणि युक्ती यांचा योग्य वापर केल्यास कोणत्याही कामातील अडचणी दूर होतात. इच्छित ध्येय साध्य झाल्याशिवाय प्रयत्न अर्धवट सोडून देणे म्हणजे माघार घेणे होय, म्हणून यश मिळवण्यासाठी प्रत्येकाच्या अंगी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास आवश्यक असतो.

१) कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ?

२) कोणत्या गोष्टींचा योग्य वापर केल्यास कामात अडचण येत नाही?

३) यश मिळवण्यासाठी प्रत्येकाच्या अंगी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात?

प्रश्न 6. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर ८ ते १० ओळीत निबंध लिहा.
१) माझी शाळा
२) माझा आवडता सण
३) माझा आवडता प्राणी
४) माझा आवडता खेळ

प्रश्न 7. 'वाचनाचे महत्त्व' सांगणारे पत्र छोट्या भावास लिहा.

किंवा

पुढील मुद्दयांच्या आधारे गोष्ट तयार करा व योग्य शीर्षक दया. 

एक कावळा - तहान लागणे - पाणी कोठेही न मिळणे - वणवण फिरणे. रांजण दिसणे-पाणी कमी - विचार करणे - युक्ती सूचने - दगड टाकणे- पाणीवर येणे - पाणी पिणे - तात्पर्य.

(प्रश्नपत्रिका प्रथम सत्र 2023 24)