प्रथम सत्र परीक्षा इयत्ता आठवी मराठी 2023 24 
Pratham Satra Pariksha 2023

प्रथम सत्र परीक्षा मराठी पेपर 2023

इयत्ता : 8वी | वेळ : 2 तास
 विषय : मराठी | एकूण गुण : 50

(pratham satra pariksha 2023 marathi)
सूचना:
1) सूचनेनुसार आकलनकृती व व्याकरणकृती यामधील आकृत्या काढाव्यात.
2) आकृत्या पेननेच काढाव्यात.
3) उपयोजित लेखनातील कृतींसाठी (सूचना, निवेदन) आकृतींची आवश्यकता नाही. तसेच या कृती उत्तरपत्रिकेत लिहिण्याची आवश्यकता नाही.
4) स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसारच लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष दयावे.(pratham satra pariksha 2023 8th marathi)

(इयत्ता आठवी मराठी पेपर 2023)

विभाग 1 गद्य


प्रश्न 1. अ) खालील उतारा वाचून सूचनेनुसार कृती सोडवा. (गुण -8)

1) आकृती पूर्ण करा. (गुण -2)

......... < आसमंतात भरलेले संमेलन > ..........

__
आसमंतात सुरांचे, शब्दांचे आणि आवाजांचे संमेलनच भरलेले असते. गावाला जाग आलेली असते. शाळेतली प्रार्थना मंदपणे आपल्या कानांवर येत असते. जनावरांचे हंबरणे मध्येच वातावरणाला भारभूत करते. लहान मुलांचा आवाज वातावरणाला छेदून अवकाशात जात असतो. घरातल्या भांड्यांचे आवाज, धुण्याचा आवाज, भाकरी थापण्याचा आवाज, काटक्या मोडण्याचा आवाज, कोरड्याशाला दिलेल्या फोडणीचा तड्तड़ करणारा आवाज, ओठ मिटून रवीचे तोंड दाबून ठेवणाऱ्या ताक घुसळणाऱ्या माठाचा आवाज, त्याबरोबर स्स् स्स् असा आवाज काढणान्या गौळणीचा आवाज, नानाविध पशुपक्ष्यांचे आवाज, दूर अंतरावरून घुमतघुमत येणारा झऱ्याचा आवाज, ओढ्याची खळखळ, पानांची सळसळ, मध्येच फाटकन येणारा चाबकाचा आवाज, रस्त्यावर अकारण भुंकणाऱ्या कुत्र्यांचा आवाज, किडामुंगी टिपण्यासाठी बाहेर पडणाऱ्या कोंबड्यांचा कॉक कॉक असा ठेका धरणारा आवाज, देवळातल्या नानाविध आकारांच्या घंटांचा आवाज, नवजात कोकराचा मधल्या पट्टीचा आवाज, स्वयंपाक करणाऱ्या आईसमोर आठवून आठवून रडत बसणाऱ्या लेकराचा आवाज, जनावरांच्या हंबरण्याचा, त्यांना गायरानात नेताना येणारा शेकडो खुरांचा आवाज, घरकामात दंग झालेल्या एखाद्या सुनेच्या बांगड्यांचा आवाज! किती म्हणून सांगावेत ?
_______________________________________

2) चौकटी पूर्ण करा. (गुण -2)

i) गौळणीचा आवाज
ii) कोंबड्याचा आवाज

3) चूक की बरोबर लिहा. (गुण -2)

1) शाळेतली प्रार्थना मंदपणे आपल्या कानावर येत असते.
2) लहान मुलांचा आवाज वातावरणाला छेदून अवकाशात जात नसतो.

4) स्वमत

'आवाजाची सोबत' ही संकल्पना तुमच्या शब्दांत लिहा.

आ) खालील उतारा वाचून सूचनेनुसार कृती सोडवा.

1) आकृतिबंध पूर्ण करा.


अण्णाभाऊ साठे यांना मोह असणाऱ्या गोष्टी
1. __________
2. __________
3. __________
4. __________

_______________________________________
अण्णा हसत हसतच म्हणाले, "विठ्ठला, बंगला, मोटर, बागबगीचा, रुबाबदार कपडे, लिखाण करण्यासाठी वेगळी खोली, खोलीत फुलदाणी, टेबल, आरामखुर्ची या सर्वसाधनांचा मला मोह नाही. अरे, झोपड्यात दीनदलितांची दुःखं मला अनुभवायला मिळतात. गोरगरिबांची पोटतिडकीची भाषा, त्यांचं जीवनमान, तिथली वास्तवता मी झोपडीत राहूनच लिहू शकेन. बंगल्यात मला एक अक्षरही सुचणार नाही. बंगल्यात ओढूनताणून काल्पनिक लिखाण होईल, झोपडीत उपाशी पोटं कशी जगतात, पावसाळ्यात झोपडं गळतं तेव्हा त्या पाण्याखाली टेचकी भगुलं, परात कशी लावली जाते, थंडीच्या महिन्यांत दीनदुबळ्यांना थंडीत कुडकुडत बसावं लागतं, इथं दुःखाला झेलत जगणारी माणसे- त्यांची पालं त्यांच्या हाणामाऱ्या, विठ्ठल, काय सांगू-अरे, वास्तवानं ओतप्रोत भरलेल्या या दुबळ्या जगाचंसत्य साहित्य मला बंगल्यात बसून लिहिता येणार नाही. माझ्या कादंबऱ्यांचं मानधन मॉस्कोतच राहू दे. त्या संपत्तीनं मी बिघडून जाईन, गरिबीला विसरून जाईन, सत्य लिखाणाला पारखा होईन, म्हणून मला ते मानधन नको."
_______________________________________
2) पुढीलपैकी योग्य उत्तराचा पर्याय निवडून चौकट पूर्ण करा.

अ) कादंबरीच्या मानधनामुळे अण्णा भाऊ साठे विसरून जाणारी गोष्ट - __________
i) श्रीमंती
ii) माणुसकी
(iii) गरिबी

ब) अण्णा भाऊंच्या कादंबऱ्यांचं मानधन या ठिकाणी राहू दे अशी त्यांची इच्छा होती. -___________

i) कोलंबो
ii) मॉस्को
iii) काठमांडू

3) केव्हा ते लिहा.
पाण्याखाली टेचकी, भगुलं, परात लावली जातात-
_____________

4) स्वमत -
अण्णा भाऊंच्या राहणीमानाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.

विभाग 2: पद्य


प्रश्न 2 पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

1) आकृती पूर्ण करा.

कवीने श्रावण महिन्याला दिलेली नावे
1.________
2.________
_______________________________________
असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो सृष्टीचा गा चित्रकार हिर्वा देखावा रेखितो कलावंत हा साजिरा काय त्याची कलागत जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी रिमझिम पहाळीचं गाणं बोलतो झाडांशी वेण्या गुंफितो वेलींच्या वेली लाजल्या लाजल्या
पाना-फुलांचे पातळ थेंबाथेंबांनी सजल्या झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा दहीहंडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा पावसाचं घर कसं लख्ख उन्हात बांधतो खोडी काढून खट्याळ झाडाआड तो लपतो
_______________________________________
2) एका शब्दात उत्तर लिहा.

1) साजिरा कलावंत -__________
2) दहीहंडीच्या संगती चिंब होणारा-_________

3) 'नागपंचमी' या सणाची माहिती तुमच्या शब्दांत लिहा.
.

विभाग 3 : स्थूलवाचन


प्रश्न 3 खालील कृती सूचनेनुसार सोडवा. (कोणत्याही दोन कृती)

1) तुमच्या मते, लिओनार्दो यांचे जगावर असलेले ऋण लिहा.
2) थोडक्यात माहिती लिहा - लिओनार्दोचे जगप्रसिद्ध चित्र मोनालिसा
3) 'आजही लोक लिओनार्दो यांच्या नोंदवह्यांचा अभ्यास करतात,' या विधानामागील कारण लिहा.

विभाग 4 : व्याकरण

अ) खालील तक्ता पूर्ण करा.

शब्द              | मूळशब्द | सामान्यरूप
1) गाड्यांनी.   |_______| ________
2)भारतात.     |_______| ________

आ) योग्य जोड्या जुळवा.
1) विद्यार्थी ________ अ) सु + अल्प
2) स्वल्प   ________  आ) राम + ईश्वर
3) जगन्नाथ________  इ) विद्या + अर्थी
4) रामेश्वर ________   ई) जगत् + नाथ

इ) समानार्थी शब्द लिहा.
1) समुद्र -
2) रस्ता -
ई) खालील वाक्याचे प्रकार ओळखा.
(मराठी पेपर प्रथम सत्र)
1) माझे घर शाळेपासून जवळ आहे.
2) अहाहा! किती सुंदर देखावा आहे हा!

उ) खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. (कोणतेही एक)

1) खोडी काढणे -
2) कानात प्राण आणून ऐकणे -

विभाग 5: उपयोजित लेखन


प्रश्न 5) खालील निवेदन वाचा व त्यावरील कृती सोडवा.

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र मा. व्यवस्थापकांस लिहा.
.
2) खालील मुद्यांच्या आधारे कथा पूर्ण करा.

मुद्दे : संध्याकाळची वेळ...... खूप गर्दी..... श्रीमंताचे पैशांचे पाकीट पडणे...... गरीब विद्यार्थी.....पाकीट हेडमास्तरांकडे देणे ......श्रीमंताचे शाळेत येणे.. प्रामाणिकपणाचे फळ...

3) निबंधलेखन :
(प्रथम सत्र परीक्षा)
खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा. (80 ते 100 शब्दांत लेखन करा.)

1) माझा आवडता खेळाडू
2) मी अनुभवलेला पहिला पाऊस