BCCI Banned Indian Player For Two Years: भारतात वर्ल्डकप (icc world cup 2023)आता रंगात आला आहे. या वर्ल्डकप मध्ये भारतीय संघ दमदार कामगिरी करत असून सलग सहा विजय मिळवत गुणतालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर आपलं स्थान अबाधित राखल आहे. सगळे क्रिकेट  फॅन्स वर्ल्ड कप ची मज्जा घेत असताना बीसीसीआयने मात्र भारतीय खेळाडूवर कारवाई करत दोन वर्षाची बंदी घातली. चला तर जाणून घ्या कोणता आहे हा खेळाडू? आणि त्यांना नेमकं केले काय?
BANNED By BCCI For 2 Years In Age Fudging Case

बीसीसीआय नियमांशी कधीही तडजोड करत नाही आणि हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवलेला आहे. मग पुढील खेळाडू कितीही मोठा असू दे त्याला इतरांप्रमाणेच नियम लावले जातात. बीसीसी ने क्रिकेटचे हित साधाव म्हणून काही नियम बनवले आहेत आणि त्यामध्येच भारताचा क्रिकेटपटू दोषी सापडला आहे.

जम्मू काश्मीर(Jammu Kashmir) येथील क्रिकेटपटू वंशज शर्मा ( Vanshaj Sharma) हा आपल्या वेगवेगळ्या जन्मतारकांसह दोन वेगवेगळी जन्म प्रमाणपत्र दिल्याबद्दल अडचणीत सापडला आहे. वंशज जम्मू येथील बिश्नाह येथे राहतो मात्र तो क्रिकेट खेळण्यासाठी बिहार कडे गेला होता. बिहारच्या क्रिकेट संघामधून खेळत असताना त्याच्यावर आता ही कारवाई करण्यात आली आहे. 

ब्रिगेडियर अनिल गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार क्रिकेट असोसिएशन साठी सध्या वंशज शर्मा क्रिकेट खेळत आहे. जम्मूच्या संघासाठी नाही असं त्यांनी प्रथम सांगितला आहे. 2020 21 च्या हंगामामध्ये प्रथम 19 वर्षाखालील खेळाडू म्हणून त्याला जम्मू येथे नोंदणीकृत करण्यात आलं होतं मात्र तो कधीही जम्मू-काश्मीरच्या क्रिकेट संघाकडून खेळला नाही. त्यानंतर तो बिहार क्रिकेट असोशियन मध्ये गेला तेथे त्यांनी त्याची वेगळ्या जन्मतारखेसह 23 वर्षाखालील खेळाडू म्हणून नोंदणी केलेली आहे. ज्यावेळी बीसीसीआयला ही गोष्ट लक्षात आली. त्यावेळी त्यांनी वंशज वर कारवाई केली आहे. एकापेक्षा जास्त प्रमाणपत्र सादर केल्याने बीसीसीएने वंशजवळ बंदी घातली आहे. अनिल गुप्ता हे जम्मू- काश्मीर क्रिकेट असोशियन चे प्रमुख आहेत.

जम्मू काश्मीर क्रिकेट टीमने अधिकृतपणे सांगितले आहे की 27 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या बीसीसीआय टूर्नामेंट मधून शर्मावर दोन वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे या बंदीमुळे तो आता कोणत्याही वयोगटातील स्पर्धेमध्ये खेळू शकणार नाही. 

Vanshaj Sharma is Indian cricketer, Vanshaj is Player of Jammu and Kashmir in domestic cricket. He has been banned
For 2 years. 

भारतीय संघ क्रिकेट वर्ल्डकप मध्ये अव्वल

सध्या सुरू असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत गुण तालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत वर्ल्ड कप चे सहा सामने झाले आहेत त्यामध्ये भारताने सहा ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

भारताला आता केवळ एक सामना जिंकला तर सेमी फायनल मधील आपलं स्थान पक्क करता येणार आहे.