Lunar Eclipse 2023: आज 28 ऑक्टोबर(चंद्र ग्रहण डेट) रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होणार असून भारतामधून हे चंद्रग्रहण आपल्याला रात्री 1.05 वाजल्यापासून 2.22 पर्यंत पाहता येणार आहे.(chandra grahan 2023 in india date and time) 2023 मधील होणारे हे चंद्रग्रहण खंडग्रास चंद्रग्रहण असून हे ग्रहण आशिया आफ्रिका युरोप ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका या खंडातील लोकांना दिसणार आहे यामध्ये भारताचा देखील समावेश आहे.(chandra grahan 2023 in india)

चंद्रग्रहण का होते?

ज्यावेळेस सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेमध्ये येतात त्यावेळी ग्रहण होत असते. 
चंद्रग्रहण: सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी आल्यानंतर पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडते आणि त्यामुळे चंद्रग्रहण होत असते. 

चंद्रग्रहण होत असताना आपल्याला तीन प्रकारे चंद्रग्रहण दिसत असते. यामध्ये छायाकल्प, खग्रास आणि खंडग्रास असे तीन प्रकार आहेत. आज 28 ऑक्टोंबर रोजी होणारे चंद्रग्रहण हे खंडग्रास(चंद्रग्रहण 2023 मराठी) प्रकारातील चंद्रग्रहण आहे. 14 ऑक्टोंबर रोजी या महिन्यात कंकणाकृती सूर्यग्रहण झाले होते. सूर्यग्रहण झाल्यानंतर चंद्रग्रहण (खंडग्रास चंद्रग्रहण 2023) होत असते.

सूर्यग्रहण: पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये ज्यावेळी चंद्र येतो त्यावेळी सूर्यग्रहण होत असते. 

चंद्रग्रहण लाईव्ह घरीच कसे पाहायचे?

आपल्याला चंद्रग्रहण(chandra grahan 2023) लाईव्ह देखील पाहता येणार आहे यासाठी आपल्याला घराबाहेर पडायची सुद्धा गरज नाही. आपण ऑनलाइन यूट्यूब चैनल वर यावेळी चंद्रग्रहण पाहू शकतो. अमेरिका स्थित असलेली नासा ही स्पेस एजन्सीने यावेळीचे चंद्रग्रहण आपल्यासाठी लाईव्ह प्रक्षेपण करणार आहे. या लाईव्ह स्ट्रीमिंगचे प्रक्षेपण तुम्ही https://www.youtube.com/@NASA या लिंक वर पाहू शकता. 

कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी

चंद्र ग्रहण 2023 मराठी: कोजागिरी पौर्णिमा 28 ऑक्टोबर रोजी यावर्षी आहे आणि त्याच दिवशी चंद्रग्रहण सुद्धा आपल्याला पाहता येणार आहे. हा दुर्मिळ योगायोग असून कोजागिरी पोर्णिमा हा हिंदूंसाठी एक महत्त्वाचा सण आहे. चंद्राच्या प्रकाशामध्ये या दिवशी दूध आठवले जाते. बऱ्याच ठिकाणी चंद्रग्रहण असल्यामुळे उद्या रविवारी कोजागिरी पौर्णिमा साजरी करणार आहेत. (chandragrahanam oct 2023)

अख्यायिका आहे की, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी देवीचा जन्म झाला होता. या दिवशी पृथ्वीवर माता लक्ष्मीचा वास सर्वत्र असतो. म्हणून बऱ्याच ठिकाणी या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा देखील केली जाते. काही ठिकाणी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम देखील या दिवशी आयोजित करण्यात येतात. (timing of chandra grahan 28 october 2023)