चंद्रग्रहण कधी दिसणार? चंद्र ग्रहण किती वाजता आहे 2023
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्र ग्रहण 28 अक्टूबर 2023 रोजी भारतात मध्यरात्री 01:05 वाजता ग्रहण(Chandra Grahan 2023) सुरू होऊन मध्यरात्री 02:24 पर्यंत हे ग्रहण चालणार आहे. ह्या आधी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी 5 मे 2023 रोजी पहिले चंद्रग्रहण(Lunar Eclipse 2023) असून हे चंद्रग्रहण जगातील अनेक भागात दिसले होते मात्र भारतात हे ग्रहण दिसले नाही. यावेळचे चंद्रग्रहण मध्यरात्रीच्या सुमारास भारतातील सर्व भागात दृश्यमान होईल.
ग्रहणाची वेळ
ग्रहण सुरू होते :- मध्यरात्री 01:05
ग्रहण मध्य :- मध्यरात्री 01:44
ग्रहण समाप्त :- मध्यरात्री 02:24
ग्रहण कालावधी :- 01 तास 19 मिनिटे
चंद्रग्रहण कधी होते?
हे खंडग्रास चंद्रग्रहण असेल. हे चंद्रग्रहण अश्विनी नक्षत्र आणि मेष राशीमध्ये होईल. 2023 मध्ये होणारे एकमेव चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. 14 ऑक्टोबरला सूर्यग्रहण झाल्यानंतर 14 दिवसांनी हे चंद्रग्रहण होणार आहे. नासाच्या मते, चंद्रग्रहण पौर्णिमेच्या टप्प्यात होते. जेव्हा पृथ्वी चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये स्थित असते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्राच्या पृष्ठभागावर पडते, ज्यामुळे चंद्राचा पृष्ठभाग अस्पष्ट होतो. कधीकधी चंद्राचा पृष्ठभाग काही तासांसाठी पूर्णपणे लाल होतो.(चंद्रग्रहण 2023 मराठी)
पुढील चंद्रग्रहण संपूर्ण चंद्रग्रहण असेल जे भारतात 7 सप्टेंबर 2025 रोजी दिसणार आहे. संपूर्ण चंद्र जेव्हा पृथ्वीच्या सावलीतून जातो तेव्हा संपूर्ण चंद्रग्रहण होते. यापूर्वी 8 नोव्हेंबर 2022 रोजी भारताने संपूर्ण चंद्रग्रहण पाहिले होते.
शरद पौर्णिमेला चंद्रग्रहण नऊ वर्षांनी होत आहे, अन्यथा ते सहसा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीच होते.