Zee Marathi to stop Chala Hawa Yeu Dya-show: महाराष्ट्रामध्ये मागील 10 वर्ष आपण एक शो नेहमी पाहत होतो आणि त्या शोची सुरुवात 'कसे आहात मंडळी? मजेत ना? आणि आपला नेहमीचा, आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे!' या संवादाने होत असायची. या शोचं नाव आहे चला हवा येऊ द्या. (Marathi entertainment industry) आता हा शो नोव्हेंबर पासून बंद होणार आहे. 
Chala Hawa Yeu Dya
मागील काही वर्षांमध्ये चला हवा येऊ द्या या शोची लोकप्रियता कमी होताना दिसत होते. सोबत TRP देखील घसरली आणि यामुळेच या आठवड्यामध्ये कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण होणार आहे.

छोट्या पडद्यावर चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम खूपच प्रसिद्ध झाला होता. सन 2014 या वर्षी रितेश देशमुख अभिनेता लय भारी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता आणि त्याचवेळी चला हवा येऊ द्या हा शो देखील प्रदर्शित झाला. झी मराठी या वाहिनीवर विनोदाने भरलेला कार्यक्रम फु बाई फु हा थांबल्यानंतर नवीन मालिका सुरू होण्यासाठी काही दिवस बाकी होते. तर दुसरीकडे जी स्टुडिओचा लय भारी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. लय भारी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी त्यावेळचे अधिकारी काही नवीन संकल्पना मांडत होते. या संकल्पनेमध्ये निखिल साने दीपक राज्याध्यक्ष निलेश मयेकर यांनी विशेष योगदान दिलं होतं. संदेश घुगे यांनी लय भारी स्पेशल या एपिसोडची आखणी केली होती. तर या एपिसोड चे सूत्रसंचालन डॉक्टर निलेश साबळे यांनी केलं होतं. त्यांच्यासोबत भाऊ कदम आणि कुशल बद्रिके हे देखील होते. केवळ बारा तासामध्ये तयार झालेले या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आणि चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचं स्वतंत्र रूप पुढे आलं.
header ads

Chala Hawa Yeu Dya - Indian television show: फु बाई फु या विनोदी मालिकेतील सकलाकार सोबत घेत निलेश साबळे यांनी चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम सुरू केला. फु बाई फु मधील सह कलाकार कुशल बद्रिके, भाऊ कदम, श्रेया बुगडे, सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे यांच्यासोबत सुरू झालेल्या या कार्यक्रमावर मराठी चित्रपट सृष्टी तर फिदा झालीच सोबत हिंदी चित्रपट सृष्टी सुद्धा या कार्यक्रमावर फिदा झाली होती. मात्र अलीकडे हा कार्यक्रम टीआरपी मध्ये घसरला आहे. आणि वेगवेगळे पर्व उपक्रम राबवून देखील हा शो टीआरपी मध्ये वर येत नव्हता. त्यामुळे वाहिनीने हा कार्यक्रम अखेर बंद करणार असल्याची घोषणा केल्याची समजत आहे. होऊ दे व्हायरल’, ‘सेलिब्रिटी पॅटर्न’, ‘लहान तोंडी मोठा घास’, अशा वेगवेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांना पुन्हा कार्यक्रमाकडे वळवण्यासाठी प्रयत्न केला गेला. मात्र TRP मध्ये Chala Hawa yeu Dya शो वर येऊ शकला नाही.

अभिनेते दिग्दर्शक डॉक्टर निलेश साबळे (Nilesh Sable) म्हणाले, चला हवा येऊ द्या ही मालिका सध्या थांबत असली तरी प्रेक्षकांच्या कायमस्वरूपी मनात राहील. मागील नऊ वर्षे 1 हजार होऊन जास्त कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचे चाहत्यांचे मनोरंजन या कार्यक्रमाने केले आहे. माझ्यासोबत संपूर्ण टीमला या कार्यक्रमाने ओळख नाव आणि आर्थिक बाबीत स्थिरता असे सर्व काही दिले आहे. सध्या आपण थांबत आहोत असे वाहिनेकडून सांगण्यात येत आहे. मात्र पुन्हा सात-आठ महिन्यांनी नवे पर्वत सुरू होऊ शकते.

चला हवा येऊ द्या ZEE5 वर उपलब्ध आहे का?

ZEE5 वर चला हवा येऊ द्या टीव्ही मालिकेचे सर्व भाग पाहून तुम्ही आनंद घेऊ शकता. येथे चला हवा येऊ द्या हा शो पाहण्यासाठी मोफत असून यासाठी थोड्या जाहिराती पाहाव्या लागतील.  

चला हवा येऊ द्या सीझन 1 मी कुठे पाहू शकतो?

चला हवा येऊ द्या सीजन एक मध्ये 340 एपिसोड असून हे तुम्ही झी फाईव्ह मध्ये पाहू शकता.