या महत्त्वपूर्ण विजयासाठी त्यांनी संघाचे खरे सांघिक प्रयत्नांचे कौतुक केले. इंग्लंडवर अफगाणिस्तानने 69 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडने 285 धावांचा पाठलाग करत अफगाणिस्तान समोर नेस्तनाबूत झाले. अफगाणिस्तानने इंग्लंड च्या खेळाडूंना 40.3 ओव्हरमध्ये 215 धावांवर ऑलआऊट केले.
अफगाणिस्तानचा कॅप्टन हशमतुल्लाह शाहिदी याने विजयानंतर काय म्हणाला हे आपण जाणून घेऊयात.
“मी आणि आमचे सर्व सहकारी आज आनंदी आहोत. अफगाणिस्तानसाठी हा एक ऐतिहासिक विजय असून यामुळे आमचा या आत्मविश्वास वाढला आहे. या विजयाचा फायदा आम्हास या पुढील सामन्यांसाठी होईल. मला खूप अभिमान वाटत आहे. या विजयाचं श्रेय हे ओपनिंग जोडीला देत आहे. त्यांनी आम्हाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र आम्ही दुर्दैवाने मिडल ऑर्डरमध्ये आम्ही विकेट्स गमावल्या. विजयाचं श्रेय हे सलामी जोडीला. त्यातही विशेषत: गुरबाजला”, असं हशमतुल्लाह शाहिदी म्हणाला.
अफगाणिस्तानचे रहमानुल्लाह गुरुबाज व इब्राहिम झद्रान या सलामी जोडीने 114 धावा करत भागादारी केली. तर रहमानुल्लाह गुरुबाज याने 80 धावा करत अफगाणिस्तानसाठी चांगली धावसंख्या उभारली. तर इब्राहीम झद्रान याने 28 धावा करत गुरुबाजला चांगली साथ दिली.
अफगाणिस्तान प्लेईंग XI : हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमातुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.
इंग्लंड प्लेईंग XI : जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड आणि रीस टोपले.