गाढव हा शब्द मराठी भाषेमध्ये खूप प्रचलित आहे. गाढवाचा उपयोग जगामध्ये सर्वच ठिकाणी होतो. गाढव हा एक प्राणी असून त्याचा उपयोग ओझे वाहून नेण्यासाठी केला जातो. वीट भट्टीवर माती किंवा विटा वाहून आणण्यासाठी गाढवांचा उपयोग केला जातो. तर काही ठिकाणी स्थलांतरण करताना माल त्याच्यावर लादून वेगवेगळ्या गावी जातात.
गाढव हा प्राणी ओझे वाहून नेण्यासाठी खूप उपयोगी आहे. गाढव या शब्दाला मराठी भाषेमध्ये समानार्थी शब्द लांबकान्या असा आहे. गद्धा हा शब्द सुद्धा गाढव या शब्दाला मराठी भाषेत समानार्थी शब्द आहे. हिंदी भाषेमध्ये गाढवाला गधा म्हटलं जातं.
गाढव या शब्दाचा उपयोग काही वेळा एखाद्या व्यक्तीला खाली दाखवण्यासाठी किंवा अपमान करण्यासाठी देखील वापरला जातो. गाढव हे नेहमी ओझे वाहून नेते. ते स्वतःची बुद्धी वापरत नाही. किंवा कुशाग्र बुद्धीचे नसते अस लोकांचा मानस आहे. त्यामुळे गाढव हा शब्द एखाद्या व्यक्तीला उच्चारून त्याला अपमानित केलं जातं.