Gadkari Movie: 'गडकरी' हा चित्रपट केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित असून हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


 या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आले होते तेव्हापासून हा चित्रपट सातत्याने चर्चेमध्ये येत आहे आता या चित्रपटाचा टीचर देखील प्रदर्शित झाला आहे. चाहत्यांना या चित्रपटात नितीन गडकरी यांची भूमिका कोण करणार याची उत्सुकता लागून राहिली होती.

header ads

काही दिवसांपूर्वी गडकरी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. सदर पोस्टर मध्ये एक व्यक्ती पाठमोरा उभा असून त्याने दोन्ही हात मागे बांधले होते. या पोस्टरमुळे नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार याची कोणतीही स्पष्टता मिळत नव्हती. त्यासोबत आलेल्या टीचर मध्ये देखील नितीन गडकरी(Nitin Gadkari Movie)यांची भूमिका कोण साकारेल याबाबत कोणताही खुलासा करण्यात आला नव्हता. आणि याच कारणामुळे प्रेक्षकांमध्ये या टीजर ची उत्सुकता पाहायला मिळत होती.

header ads

मात्र आता मंत्री नितीन गडकरी यांची भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीचे नाव समोर येत आहे अभिनेता राहुल चोपडा(Rahul  Chopada) या चित्रपटामध्ये नितीन गडकरी यांची भूमिका साकारणार आहे आता या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत त्यामध्ये राहुल चोपडा हा नितीन गडकरी यांची भूमिका साकारताना दिसत आहे. 

गडकरी या चित्रपटात नितीन गडकरी यांच्या पत्नीची कांचन गडकरी यांची भूमिका ऐश्वर्या डोरले(Aishwarya Dorle) साकारत आहे. अभिलाष भुसारी पुष्पक भट अभय नवाथे वेदांत देशमुख हे अभिनेते या चित्रपटात झळकणार आहेत. तृप्ती प्रमिला केळकर हिने या चित्रपटात पत्रकाराची भूमिका साकारली आहे.
header ads


गडकरी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला 27 सप्टेंबर रोजी येत आहे. ए एम सिनेमा आणि अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित या चित्रपटाची निर्मिती अक्षय अनंत देशमुख यांनी केली आहे. तर अनुराग राजन भुसारी, मिहिर फाटे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे.