प्रथमता ही दुखापत(hardik pandya injury) गंभीर नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर धर्मशाला येते न्युझीलँड विरुद्ध लढतीसाठी न जाता पुण्यामध्येच तो राहिला. येथून तो बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट ॲकॅडमी मध्ये उपचारासाठी गेला असता पुढील मॅच साठी म्हणजेच इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या मॅच साठी हार्दिक पंड्या(hardik pandya news) नसणार असल्याची चर्चा होत आहे. मात्र आता समोर येत असलेल्या माहितीनुसार, तो संपूर्ण वर्ल्ड कप 2023 खेळणार नसल्याची शक्यता वाटत आहे.
जीटी जर्सी हार्दिक पंड्या 33 2023-2024 मुलांसाठी - क्रिकेट - विकत घेण्यासाठी क्लिक करा
TOI ने दिलेल्या वृत्तानुसार, हार्दिक पंड्याच्या टाचेला ग्रेड एकचे दुखापत झालेली असून त्यामुळे तो पुढील क्रिकेट सामन्यांमध्ये खेळेल की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. सध्या त्याच्यावर एनसीए मध्ये उपचार सुरू आहेत. तेथील वैद्यकीय टीमने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा ही दुखापत गंभीर नसल्याचे सांगितले जात होते. मात्र आता ही हार्दिक ची दुखापत गंभीर आहे. एनसीए हार्दिक पंड्याला जोपर्यंत पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत क्रिकेट खेळण्यासाठी पाठवू शकत नाही. हार्दिकचीही दुखापत पूर्ण बरी होण्यासाठी किमान दोन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो अशी माहिती समोर येत आहे.
एनसीए म्हणजेच राष्ट्रीय क्रिकेट ॲकॅडमी कडून हार्दिक पंड्या खेळण्यासाठी उपलब्ध नसेल असे भारतीय संघ व्यवस्थापनाला सांगण्यात आले आहे. आणि याच कारणामुळे हार्दिक पंड्या वर्ल्ड कप 2023 मधील काही सामन्यांना मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Is Hardik Pandya Alright Now? हार्दिक पांड्या आता बरा आहे का?
नितीन पटेल हे वैद्यकीय टीमचे नेतृत्व करत असून हार्दिक पंड्याच्या दुखापतीवर ते लक्ष ठेवून आहेत. 19 ऑक्टोबर रोजी झालेल्या बांगलादेश विरुद्ध मॅच मध्ये झालेली दुखापत प्रथम दर्शनी किरकोळ वाटत होती. पण ही दुखापत किरकोळ नाहीये. त्यामुळे हार्दिक पांड्या जोपर्यंत पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत त्याला यांचे मधून बाहेर पडता येणार नाही असे सांगण्यात आले आहे. वैद्यकीय टीम लवकरात लवकर त्याला संघात पाठवण्यासाठी प्रयत्न करत आहे असे सूत्रांनी टीओआयला सांगितले आहे.
Is Hardik Pandya Out Of World Cup 2023? हार्दिक पांड्या वर्ल्ड कपमधून बाहेर आहे?
हार्दिक पंड्या जरी पुढील काही सामने खेळू शकणार नसला तरी भारतीय संघ व्यवस्थापन त्याच्या बदल्यात वेगळा खेळाडू देण्याचा विचार करत नाहीये. तो संघात येण्याची वाट पाहण्यातील असे सूत्रांनी यावेळी सांगितले आहे.
(हार्दिक पांड्या ताजा न्यूज़)
वर्ल्ड कप 2023 मध्ये सध्या भारताचा संघ (india national cricket team) 10 गुणांसह गुण तक्त्यामध्ये अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियाने आत्तापर्यंत पाच लढती खेळल्या असून सर्वच लढतील मध्ये चांगल्या पद्धतीने विजय मिळवला आहे. हार्दिक पंड्याची जर खरंच गरज लागली तर तो इंजेक्शन घेऊन मैदानामध्ये उतरू शकतो मात्र स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात असे सूत्रांनी सांगितले आहे.(news about hardik pandya)