INDvsENG: आज 29 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध इंग्लंड सामना लखनऊ येथे रंगत आहे. भारताने आपल्या सर्व मॅच मध्ये आतापर्यंत विजय मिळवला आहे आणि दहा गुणांचं गुण तालुक्यामध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. गत विजेता इंग्लंडने मात्र आतापर्यंत एकच मॅच जिंकली आहे. आज आपण या लेखातून जाणून घेऊया, इंग्लंडच्या खेळाडूंना पगार जास्त मिळतो की भारतीय खेळाडूंना? आणि जर पगार जास्त मिळत असेल किंवा कमी मिळत असेल तर तो पगार किती मिळतो याबद्दलची माहिती या लेखातून आपण पाहणार आहोत.
2023 Cricket World Cup Tournament
इंग्लंडचा क्रिकेट बोर्ड खेळाडूंना वेगवेगळ्या स्तरावर करारबदक करत असते. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या वेगवेगळ्या श्रेणी इंग्लंड क्रिकेट बोर्ड ने तयार केले आहेत. तसेच मर्यादित शतकाची क्रिकेट खेळणारे श्रेणी वेगवेगळे आहे. त्यासोबत दोन्ही बॉल सोबत खेळणारे खेळाडूंचे करार ही वेगळे करण्यात आले आहेत.

इंडिया वस इंग्लंड: इंग्लंड मधले क्रिकेटपटू लाल आणि पांढऱ्या दोन्ही बॉल ने क्रिकेट खेळतो अशा क्रिकेटपटूंना वर्षाला नऊ लाख पाउंड इतकी रक्कम पगार म्हणून दिली जाते. भारतीय रुपया नुसार याची किंमत 9.10 कोटी होते. 

बीसीसीआय मधील सर्वोच्च श्रेणीत म्हणजेच ए प्लस मध्ये क्रिकेट खेळणाऱ्यांपेक्षा ही रक्कम दोन कोटी रुपयांनी जास्त आहे. भारतामध्ये ए प्लस श्रेणीमध्ये सात कोटी रुपये पगार दिला जातो. विराट कोहली रोहित शर्मा बुमराह यासारखे प्लेयर ए प्लस श्रेणीमध्ये येतात.(ind vs eng live streaming)

इंग्लंड मध्ये फक्त कसोटी क्रिकेट खेळणारे खेळाडूंना वर्षाला 6.5 लाख पौंड रक्कम देण्यात येते. हे भारतीय रुपयानुसार 6 . 55 कोटी रुपये होतात. बीसीसीआयच्या दुसऱ्या श्रेणीतील खेळाडूंना यापेक्षा दीड कोटी रुपये कमी पगार मिळतो म्हणजेच तो पगार पाच कोटी रुपये इतका आहे.

इंग्लंड क्रिकेट संघात मर्यादित ओवरची क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूस 2.5 ते 3.5 लाख पाऊंड इतकी रक्कम वेतन म्हणून दिली जाते हे भारतीय रुपया नुसार 2.53 ते 3.54 कोटी रुपये इतकं वर्षाला वेतन होतं.


बीसीसीआय मधील बी आणि सी श्रेणीतील खेळाडूंना तीन कोटी व एक कोटी रुपये अनुक्रमे वार्षिक वेतन म्हणून दिले जाते या ठिकाणी इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना भारतीय क्रिकेटपटून पेक्षा जास्त पगार मिळतो. भारतातील कसोटी क्रिकेटपटूंना 15 लाख रुपये प्रत्येक मॅच साठी त्यासोबत वन डे खेळल्यास सहा लाख रुपये आणि t20 मॅच साठी तीन लाख रुपये दिले जातात.