IND vs NZ World Cup: भारत बनाम न्यूजीलैंड क्रिकेट मॅच उद्या म्हणजे रविवारी धर्मशाला येथे होणार आहे. सध्या पॉइंट टेबल मध्ये भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ वरचढ आहेत. न्यूझीलंड देखील 8 पॉइंट मिळवत 1 नंबर स्थानावर आहे. तर वर्ल्ड कप प्वाइंट टेबलमध्ये भारतीय क्रिकेट संघ 8 पॉइंट मिळवत दुसऱ्या स्थानावर आहे. आता उद्याची मॅच निर्णय ठरणार आहे कारण भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ टॉप ऑर्डरमध्ये आहेत. उद्या कोण मॅच जिंकेल याकडे सर्व चहात्यांचं लक्ष लागून आहे. 
मात्र विश्वचषकाचा इतिहासावर नजर टाकले असता न्यूजीलैंड संघाचे पारडे जड आहे. मागील तब्बल वीस वर्षांमध्येभारतीय क्रिकेट टीम ला न्युझीलँडविरुद्ध एकही सामना विश्वचषकामध्ये जिंकता आला नाही.

मागच्या विश्वचषकामध्ये उपविजेता राहिलेला न्यूझीलंड क्रिकेट संघाला मागील वीस वर्षांमध्ये एकदाही भारत पराभूत करू शकला नाही. प्रत्येक आयसीसी स्पर्धेमध्ये न्युझीलँड ने भारताला मात दिली आहे. विश्वचषकामध्ये भारताची न्यूझीलंड विरुद्ध कामगिरी खराब राहिलेली आहे. 2019 यावर्षी झालेल्या विश्वचषकांमध्ये मँचेस्टर येथे भारताचा पराभव झाला होता आणि हे भारतीयांचे जिव्हारी लागलेला आहे. आज पुढील वर्ल्ड कप चालू आहे मात्र 2019 चा वर्ल्डकप मध्ये झालेला पराजय भारतीय चाहते अजूनही विसरले नाहीत.(india national cricket team)
header ads

2003 यावर्षी भारताने न्यूझीलंडला शेवटचं पराभव केलेल आहे. त्यावेळी सौरव गांगुली याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंड या संघाला हरवलं होत. त्यावेळी सध्या भारताच्या संघामध्ये खेळणाऱ्या विराट कोहली हा केवळ 14 वर्षीय होता. तर भारतीय संघाचा कर्णधार असलेला रोहित शर्मा केवळ 16 वर्षाचा होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एम एस धोनी, गौतम गंभीर यांनी पदार्पण देखील केलं नव्हत. तेव्हापासून भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध पराभव स्वीकारत आहे. त्यामुळे या वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतीय संघ न्यूझीलंडच्या संघाला हरवेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वन डे क्रिकेट बद्दल बोलायचं तर न्यूझीलंड आणि भारत यांच्यामध्ये आत्तापर्यंत 116 सामने झाले आहेत त्यापैकी भारतीय संघाने 58 सामन्यांमध्ये विजय मिळवला तर न्यूझीलंडच्या संघाने 50 सामन्यात विजय मिळवला आहे. तर सात सामने अनिर्णयत त्यामुळे उद्या होणाऱ्या भारत-न्यूझीलंड मॅच मध्ये कोण जिंकेल? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिल आहे.
header ads

आत्तापर्यंत नऊ सामने विश्वचषकामध्ये भारत आणि न्यूझीलंड या संघामध्ये झाले आहेत तर यामध्ये पाच सामन्यांमध्ये न्यूझीलंडच्या संघाने बाजी मारली तर भारताला केवळ तीन सामने जिंकता आले आहेत तर एक सामना अनिर्णीत राहिला होता. 

1975 च्या विश्वचषकामध्ये पहिल्यांदा भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सामना खेळण्यात आला होत
 तर शेवटचा सामना हा 2019 मध्ये झाला आहे त्यामध्ये न्युझीलँडच्या संघाने विजय मिळवला होता. मात्र 2003 पासून भारताला कधीही विश्वचषकामध्ये न्यूझीलंडला हरवता आलं नाही.  

आपल्या इंडिया क्रिकेट टीम चा विचार केल्यास सध्याचे विश्व चषकांमध्ये हा संघ फॉर्मात आहे. आत्तापर्यंत झालेल्या चार सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे आणि गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश यासारख्या बलाढ्य संघांचा पराभव भारतीय संघाने केला आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडचा संघ पहिल्या क्रमांकावर गुणतालिकेत आहे आत्तापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये भारत आणि न्यूझीलंड हे दोनच संघ अजेय आहेत. तर बाकी आठ संघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे त्यामुळे आता भारत आणि न्यूझीलंड या दोन संघांमध्ये मॅच होत असल्याने अव्वल स्थान कोण पटकावेल हे या मॅच वरून ठरणार आहे.
header ads
 

इंडिया का अगला मैच कब है?

टीम इंडिया मैच हा उद्या दिनांक 22 रोजी दुपारी दोन वाजल्यापासून न्यूझीलंड या  संघाविरुद्ध होणार आहे.