एकावेळी एक लाखांहून अधिक प्रेक्षक अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मॅच पाहू शकतात. मिळालेल्या माहितनुसार टीम इंडियाचा कर्णधार असलेला रोहित शर्मा (Rohit Sharma) याने पत्रकार परिषद (Press Conference) मध्ये स्टार फलंदाज शुभमन गिल याच्या फिटनेस वर उत्तर दिलं आहे.
(ind vs pak status) पाकिस्तानविरुद्धच्या शुभमन गिल सामन्यात खेळणार की नाही? असा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. रोहित शर्माने (Rohit Sharma Statement) त्यावर उत्तर दिलं असून तो म्हणाला, " पाकिस्तानविरुद्ध मॅच खेळण्यासाठी टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल हा 99 टक्के फिट आहे. त्यामुळे आता शुभमन (Shubman Gill) आणि रोहित शर्मा सलामीसाठी येतील, हे पक्कं झालंय.
यावर्षी वर्ल्डकपचे दोन सराव सामने पावसामुळे होऊ शकले नाहीत. त्यातच शुभमन गिलला पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये डेंग्यू या आजाराने ग्रासल्याने हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र मिळतं असलेल्या माहिती नुसार आता तो फिट असून शुभमन नेट्समध्ये बॅटिंगची प्रॅक्टिस करताना दिसला आहे.
आशिया कपमध्ये शुभमन गिलने पाकिस्तानविरुद्ध जबरदस्त फलंदाजी केली होती. त्यामुळे शुभमन गिल कसा खेळतो याकडे सर्व भारतीय चाहत्यांच लक्ष लागून राहिल आहे.
Ind Vs Pak playing 11 today ( भारत वि. पाक 11 क्रिकेटपटू)
टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (व्हाईस कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.(ind vs pak world cup 2023 playing 11)
पाकिस्तानचा संघ : बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिजवान, सऊद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हारिस रऊफ, हसन अली, शाहीन अफरीदी, मोहम्मद वसीम.(ind vs pak playing xi)
Ind Vs Pak today match time (भारत विरुद्ध पाकिस्तान आज किती वाजता)
आजची भारत विरुद्ध पाकिस्तान वर्ल्डकप क्रिकेट मॅच ठीक 2 वाजता चालू होणार आहे. त्यापूर्वी 12.30 वाजता रंगारंग कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्यात अरिजीत सिंग यासारखे गायक येणार आहेत.