पाकिस्तान सोबत भारताची ही मॅच 14 तारखेला अहमदाबाद येथे होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघाला गुड न्युज मिळाली असून आपल्या टीमचा कर्णधार रोहीत शर्माची काळजी देखील मिटली आहे . याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या टीम इंडियात एक मॅच विनर खेळाडू ऍड झाला आहे.
2023 च्या या वर्ल्ड कप (Cricket World Cup 2023) मध्ये भारताने दोन सामने जिकल आहेत. भारतान ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात धुळ चारल्या नंतर दुसऱ्या सामन्यात अफगानिस्तान सघा ला 8 विकेटने हरवले. आता तिसरा सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे पाकिस्तान सोबत रंगणार असून सामना सुरु होण्याअगोदर भारतीय संघाला आणि रोहित शर्मा(Rohit Sharma) ला खुप आनंदाची बातमी मिळाली आहे. संघात एक मॅच विनर खेळाडूच आगमन झाले असून ही भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आहे .
भारताचा सलामीवीर शुभमन गिलला (Shubman Gill) डेंग्यू झाला होता हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे शुभमन गिल विश्वचषकातील दोन सामने खेळू शकला नाही. शुभमन गिल भारतीय संघासोबत नवी दिल्लीत आला नव्हता, तो चेन्नईत राहिला. त्याच्या जागी भारतीय संघात इशान किशनला संधी देण्यात आली होती. मात्र इशान किशन मोठी खेळी साकारण्यात 2 सामन्यांत अपयशी ठरलेला आहे. मात्र गील आल्याने रोहितची ही चिंता मात्र संपणार आहे. तो केवळ दाखल न होता पाकिस्तानविरुद्धच्या(India vs Pakistan) सामन्यापूर्वी फलंदाजीचा सराव देखील सुरू केला आहे. शुभमन गिल बुधवारी चेन्नईहून अहमदाबादला पोहोचला.(Cricket Match )