भारताने पाकिस्तानवर पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवला आहे. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानचा डाव 191 धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात भारताने 30.3 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 192 धावांचे लक्ष्य गाठले. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ८६ धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने नाबाद ५३ धावा करत भारताला विजय मिळवून दिला.
या विजयासह टीम इंडियाने न्यूझीलंडला मागे टाकत गुणतक्त्यात अव्वल स्थानी पोहोचली आहे.
🏆 वर्ल्डकपमधील India चे Pakistan वरील विजय
१९९२- भारताचा ४३ धावांनी विजय
१९९६- भारताचा ३९ धावांनी विजय
१९९९- भारताचा ४७ धावांनी विजय
२००३- भारताचा ६ विकेटनी विजय
२०११- भारताचा २९ धावांनी विजय
२०१५- भारताचा ७६ धांनी विजय
२०१९- भारताचा ८९ धावांनी विजय
२०२३- भारताचा ७ विकेटनी विजय
पंत प्रधान मोदींनी केले टीम इंडियाचे कौतूक
वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव करत सलग 3ऱ्या विजयाची नोंद केली. त्यानंतर टीम इंडियावर कौतुकाचा भरपूर वर्षाव होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करत संघाचे कौतूक केले आहे. अहमदाबादमध्ये आज एक उत्तम, सर्वांगीण उत्कृष्ट असा विजय भारतीय संघानं मिळवला आहे. याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन आणि पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा, असे मोदी यांनी यावेळी म्हणाले.
World Cup 2023 - टीम इंडिया पॉईंट टेबलमध्ये नंबर वन
आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषक सामना भारताने जिंकल्याने विश्वचषकाच्या गुणतालिकेत 1 ले स्थान पटकावले आहे. भारताने सलग तीन सामने जिंकून 6 गुण मिळवले आहेत. तर न्यूझीलंडचा संघ 2ऱ्या स्थानावर आला. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ 3 ऱ्या स्थानावर असून पाकिस्तानचा संघ चौथ्या स्थानावर आला आहे. पाकिस्तानने भारतासमोर 192 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान 7 गडी राखून पूर्ण केले. यासह भारताने वर्ल्डकपमध्ये सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. भारताकडून रोहित शर्माने 86 तर श्रेयस अय्यरने 53 धावांची खेळी केली.
रोहितचे अर्धशतक; केला रेकॉर्ड
192 धावांचा पाठलाग करताना भारताच्या रोहित शर्माने पाकच्या गोलंदाजांची जब्बर धुलाई केली. त्याने केवळ 36 चेंडूत 50 धावा केल्या. ही धावसंख्या गाठताना 3 चौकार आणि 4 षटकार रोहित ने ठोकले. तर, वनडेमध्ये 300 सिक्स मारणारा रोहित हा तिसरा खेळाडू ठरला आहे.
पाकने 36 धावांत गमावल्या 8 विकेट
भारताच्या गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केल्याचे दिसून येत असून पाकिस्तानचा संघ 2 बाद 155 धावांवर होता. मात्र नंतर भारताच्या गोलंदाजांनी अवघ्या 36 धावांत 8 विकेट घेतल्या. त्यामुळे भारतीय खेळाडूंवर कौतुकाचा प्रचंड वर्षाव होत होता.