वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak World Cup) यांच्यात 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) वर सामना होणार आहे. त्याआधी बीसीसीआय (BCCI) कडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. भारत पाक सामन्याआधी येथील मैदानावर मोठा कार्यक्रम होणार आहे.

अरिजित सिंग(Arijit Singh) या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. तो त्याच्या गिटार सोबत खेळत आपल्या सुमधुर आवाजात चाहत्यांच मनोरंजन करणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 वाजता सुरू होणाऱ्या प्री-मॅच शोसाठी तयार राहा, असे बीसीसीआयने म्हटले आहे.