मोहन धारिया यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1925 रोजी झाला होता. मोहन धारिया हे केंद्रीय मंत्री होते. त्यासोबतच वनराई या संस्थेची संस्थापक देखील होते. मोहन धारिया यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात नाते या गावी झाला होता. मोहन धारिया यांचे वडील गुजरातचे होते व्यवसायानिमित्त ते महाराष्ट्रात आले आणि कोकणामध्ये स्थायिक झाले.
मोहन धारिया यांची संस्था
👉मोहन धारिया यांनी 'लोकसेना' नावाची संस्था देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सुरू केली.
👉मोहन धारिया यांनी 'नॅशनल लेबर सेंटर'ची स्थापना पुण्यात केली होती.
👉मोहन धारिया यांनी 'वनराई' या संस्थेची स्थापना इ.स. १९८३ च्या सुमारास केली होती.
मोहन धारिया यांनी अनेक पुस्तके लिहलेले आहेत. सोबत त्यांना बरेच पुरस्कार देखील मिळालेले आहेत. सोळा वर्षाचे असताना त्यांनी 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांना शिक्षाही झाली होती. मोहन धारिया यांचा मृत्यू १४ ऑक्टोबर २०१३ रोजी पूना हॉस्पिटल, पुणे येथे झाला.