Lalita Panchami 2023: नवरात्रीच्या पाचव्या दिवशी माता ललिता देवी यांच्या स्वरूपाची पूजा केली. देवीपुराण नुसार सतीच्या हाताचे बोटे ज्या स्थानावर पडले होते त्या ठिकाणी ललिता माता देवी प्रकट झाली होती. 51 शक्तिपीठांमधील एक असलेले हे स्थान मीरापुर  (प्रयागराज) येथे स्थित आहे.
Navratri 2023: Lalita Devi
अशी ही मान्यता आहे की यमुना नदीच्या तीरावर ललिता देवी तीन वेगवेगळ्या रूपांमध्ये श्रद्धाळू भक्तांना दर्शन देते. त्यामध्ये ललिता देवी, कल्याणी देवी आणि अलोपी देवी असे त्यांची नावे आहेत. नवरात्रीमध्ये या ठिकाणी मोठ्या स्वरूपात यात्रा भरते. येथे लाखो श्रद्धाळू भक्त एकत्र येतात. देवी ललिताला महात्रिपुर सुंदरी, षोडशी, ललिता, लीलावती, लीलामती, ललिता गौरी या सर्व नावांनी देखील ओळखल जात. 
header ads

चला तर जाणून घेऊया नवरात्रीमध्ये ललिता देवीचे काय महात्म्य आहे?

शारदीय नवरात्र च्या पंचमीला माता सतीच्या एका स्वरूपाची म्हणजेच ललिता देवीची पूजा केली जाते. याच दिवशी देवि स्कंद माता याची देखील पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार 10 महाविद्यांमध्ये एक असलेली देवी ललिता, यांच्या बद्दल अशी मान्यता आहे की यांची पूजा केल्याने भक्तांना प्रत्येक रोगापासून मुक्ती मिळते तसेच जीवनामध्ये खुशाली आणि शांती राहते. दांपत्य जीवनामध्ये काही भांडणे वगैरे असतील, विवाद असतील तर ललिता देवी च्या आशीर्वादाने दूर होतात.