केंद्र सरकारने महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांनी वाढ केलेली आहे. अशी बातमी आत्ता सर्वत्र ऐकायला मिळत आहे. महागाई भत्त्यात वाढ केल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होतो. महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करून ती ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के करण्यात आली आहे. नेमका हा फायदा रुपयांमध्ये किती होतो हे आज आपण जाणून घ्यायचं आहे चला तर मग जाणून घेऊया.
महागाई भत्त्यात केंद्र सरकारने चार टक्क्यांनी वाढ केली म्हणजे नेमकी किती रुपयांची पगार वाढ मिळणार हे जाणून घेऊ.
एखाद्या कर्मचाऱ्याला जर मुळ वेतन 18000 रुपये असेल तर तर त्या कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता सध्या बेचाळीस टक्के दराने असेल तर 7,560 रुपये मिळतात. मात्र हीच वाढ जर 46% नुसार धरली तर त्याचा पगार 8280 रुपये इतका होईल.
म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्यांचा मुळ पगार 56 हजार 900 रुपये तर त्याला 46% दराने 26 हजार 174 रुपये मिळणार आहेत.