मेघ हा शब्द मराठी भाषेमध्ये वापरला जातो मेघ या शब्दाचा अर्थ ढग या पद्धतीने होऊ शकतो. आकाशामध्ये ज्यावेळी मेघ येतात त्यावेळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते. ढग हे सामान्यपणे पांढरे असतात. मात्र मेघ हे रंगाने काळसर राखाडी कलरचे असतात. मेघ दाटून आल्यानंतर पाऊस पडतो.
पृथ्वीवर असलेल्या पाण्याची वाफ होऊन ती हवेत वर जाऊ लागते वर जात असताना त्याला थंड हवा लागते आणि त्याचे रूपांतर ढगांमध्ये होत
हे ढग भरपूर प्रमाणात एकत्र आल्यास त्याचे मेघ बनतात. आणि मेघांना पुन्हा थंड हवा लागली तर त्याचे पावसात रूपांतरण होते.
मेघ या शब्दाला मराठी मध्ये बरेच समानार्थी शब्द आहेत. मेघ या शब्दाला अंबुद असं देखील म्हटलं जातं. अभ्र हा शब्द देखील मेघ या शब्दाला समानार्थी शब्द आहे. जलधर असा देखील शब्द मेग या शब्दाला समानार्थी शब्द आहे. महुडा, पयोधर, अब्द, घन, जलद हे सर्व शब्द मेघ या शब्दाला समानार्थी मराठी शब्द आहेत.