MPSC न्यूज: महाराष्ट्र लोकसेवा आयोगा(MPSC) च्या विविध मुख्य परीक्षांसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (बार्टी) एकरकमी १५ हजारांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. हे आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी उत्तीर्ण उमेदवारांना 20 ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करावयाचे आहे.
एकरकमी १५ हजारांचे आर्थिक सहाय्य महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC) महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (गट-अ व गट-ब), विद्युत अभियांत्रिकी सेवा (गट-ब), निरीक्षक, वैधमापनशास्त्र (गट-ब) आणि अन्न व औषध प्रशासकीय सेवा (गट-ब) मुख्य परीक्षा २०२३ साठी अनुसूचित जातीच्या उमेदवार पात्र ठरलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीमार्फत करण्यात येणार आहे.
या योजनेचा फायदा घेण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी व अनुसूचित जातीचा असायला हवा आहे. महाराष्ट्र(Maharashtra News) राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधील महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, निरीक्षक वैधमापनशास्त्र आणि अन्न व औषध प्रशासकीय सेवा निकालाच्या यादीमध्ये समावेश असणे बंधनकारक आहे.