मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम(Interview program of candidates) स्वतंत्रपणे MPSC आयोगाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. एमपीएससी आयोगाकडून 21, 22 व 23 जानेवारी 2023 रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती.
तब्बल 10 महिन्यांनंतर निकाल जाहीर(MPSC Results announced) करण्यात आला आहे. मुलाखतीच्या वेळी मूळ प्रमाणपत्रावरून पात्रता पडताळण्याच्या अटीच्या अधीन राहून उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उमेदवाराने अर्जात दिलेली माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळल्यास संबंधित उमेदवारांचा मुलाखतीचा कार्यक्रम रद्द करण्यात येईल.
जे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र नाहीत, त्यांना त्यांच्या उत्तरपुस्तिकेतील गुण पुन्हा तपासायचे असतील तर, असे उमेदवार अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून 10 दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाइन अर्ज (Online application to the Commission) करू शकतात.
अमरावती विभागातून 58, मुंबई विभागातून 129, औरंगाबाद विभागातून 210, नाशिक विभागातून 133 , नागपूर विभागातून 86 आणि पुणे विभागातून 9 हजार 346 उमेदवार पात्र ठरले आहेत.