NET Exam 2023 Application Form Last Date: देशातल्या विद्यापीठांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या पात्रतेसाठी नेट परीक्षा घेण्यात येते. नेट या परीक्षेला बसण्यासाठी अर्ज करण्यास आज शेवट तारीख आहे. आधी ही 28 देण्यात आली होती मात्र ही तारीख वाढवण्यात आली होती. आणि 31 नोव्हेंबर करण्यात आली होती.
दरवर्षी ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीए यांच्याकडून घेतली जाते. यावर्षी सहा डिसेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीमध्ये नेट परीक्षा घेण्याचे नियोजित करण्यात आले आहे. आज 31 ऑक्टोंबर रोजी या परीक्षेचा फॉर्म भरायचा शेवटचा तारीख (ugc net last date to apply) आहे. आज जर फॉर्म भरला नाही तर उमेदवारांना परीक्षेत बसण्यास संधी मिळणार नाही. जर उमेदवारांना आजपर्यंत अर्ज भरता आला नाही तर आज रात्री बारापर्यंत हा अर्ज भरून घ्यावा कारण पुन्हा तारीख वाढवून देण्यात येणार नाही त्यामुळे या परीक्षेला बसायची संधी मुकु शकते.
या वेबसाईटवरून करा ऑनलाईन अर्ज
ऑनलाइन अर्ज (ugcnetonline) करण्यासाठी आपण जर पात्र असाल तर यूजीसी नेट च्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे ugcnet.nta.nic.in लिंक वर जाऊन तुम्हाला अर्ज भरावा लागेल. (ugc net helpline)
मृणाल कुलकर्णींची शिवानी रांगोळेच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट; म्हणाली.... | वाचा सविस्तर :
जीवन मराठी यांनी वर पोस्ट केले सोमवार, ३० ऑक्टोबर, २०२३
महत्वाच्या तारखा
परीक्षेसाठी अर्ज करण्याची आज 31 ऑक्टोंबर रोजी शेवट तारीख आहे यानंतर एडिट विंडो एक नोव्हेंबर 2023 पासून सुरुवात होणार आहे. अर्ज भरताना काही चुका झाल्या असतील तर त्यामध्ये दुरुस्त्या करण्यासाठी यूजीसी ने एक ते तीन नोव्हेंबर पर्यंत आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे.
दुरुस्ती करायची विंडो एकदा बंद झाली तर उमेदवारांना त्यांच्या अर्जामध्ये दुरुस्ती (ugc net correction window 2023) करता येणार नाही त्यामुळे एक ते तीन नोव्हेंबर या तारखे दरम्यान आपण जर अर्ज चुकला असेल तर एडिट करून घ्यायचा आहे.
UGC NET Exam Dates
यूजीसी नेट (ugc net.nta online) ची ही परीक्षा 60 डिसेंबर ते 22 डिसेंबर यांच्या दरम्यान होणार आहे त्यापूर्वी उमेदवारांना ऑनलाइन हॉल तिकीट आणि परीक्षेचे स्लिप मिळणार आहे.(ugc net december 2023 exam date)