पहारेकरी समानार्थी शब्द मराठी | Synonyms of Paharekari in Marathi

पहारेकरी हा शब्द मराठी भाषेमध्ये वापरला जातो. पहारेकरी या मराठी शब्दाचा अर्थ पहारा देणारा व्यक्ती असा होतो. पहारेकरी हा घराचे रक्षण करण्यासाठी नेमतात. पूर्वीच्या काळी राजवाड्यांवर किंवा गावातील प्रतिष्ठित व्यक्ती हे आपल्या घरासमोर घराभोवती पहारेकरी ठेवत असत. हे दिवसा व रात्री पहारा देत. घरामध्ये, राजवाड्यामध्ये कोणती व्यक्ती येते? कोणती व्यक्ती जाते? याची नोंद त्यांना ठेवावी लागे. घरावर राजवाड्यावर दरोडा पडू नये, चोरी होऊ नये, अपरिचित व्यक्ती घरामध्ये, राजवाड्यामध्ये घुसू नये यासाठी पहारेकरी ठेवले जात असत.

आत्ताचे युगामध्ये पहारेकरी हे प्रत्येक कंपनीमध्ये असतात. कंपनीमध्ये बँकेमध्ये सुरक्षा देण्याचे काम पहारेकरी करत असतो. 

पहारेकरी समानार्थी शब्द मराठी

पहारेकरी या शब्दाला मराठी भाषेमध्ये अनेक समानार्थी शब्द आहेत. पहारेदार हा शब्द पहारेकरी या शब्दाला समानार्थी शब्द आहे. पाहारेकरी हा शब्द देखील पहारेकरी या शब्दाला मराठी शब्द आहे. रखवालदार असा देखील शब्द पहारेकरी या शब्दाला मराठी समानार्थी शब्द आहे. राखनदार/राखणदार हा देखील शब्द समानार्थी शब्द पहारेकरी या शब्दाला आहे. 

पहारेकरी या शब्दाला इंग्रजी मध्ये वॉचमन (watchman) हा शब्द आहे.