Cricket Information In Marathi: पाकिस्तान वस सौथ आफ्रिका विश्व कप मैच: चोकर्स म्हणून घेत असलेल्या साऊथ आफ्रिकेने वर्ल्डकप 2023 मध्ये अभूतपूर्व कामगिरी केले आहे. आत्तापर्यंत झालेल्या सहा मॅच पैकी केवळ एक मॅच साउथ आफ्रिकेने हरली आहे. आज पाकिस्तान विरुद्ध साऊथ आफ्रिका ही वर्ल्ड कप मधील मॅच होती. या मॅच मध्ये साउथ आफ्रिकेने पाकिस्तानला हरवल आहे. आजच्या विजयामुळे साऊथ आफ्रिकेचे पॉईंट टेबल मधले स्थान अव्वल झाले. दहा गुणांसह गुण तालिकेत पहिल्या क्रमांकावर साऊथ आफ्रिका आली आहे. 
Pakistan Vs South Africa Cricket World Cup 2023 Match
साऊथ आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान हा सामना आज एम. ए. चिदंबरम स्टेडियम वर रंगला. पाकिस्तानचा संघ ह्या वर्ल्ड कप मध्ये काही चांगली कामगिरी करू शकला नाही त्यामुळे त्यांची बदनामी क्रिकेट विश्वात होत आहे. आजच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी करून दाखवतील अशी आशा चाहत्यांना लागली होती.  

ODI World Cup 2023, PAK vs SA पाकिस्तानचा संघ टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत असताना 270 धावा काढत 46.4 ओव्हरमध्ये संपूर्ण टीम तंबूत परतली. तर दुसऱ्या बाजूला ह्या वर्ल्ड कप मध्ये साउथ आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत असताना जवळपास 350 च्यावर धावा केल्या आहेत त्यामुळे हे 270 चे आव्हान त्यांच्यासाठी काहीच नव्हते. तरी देखील पाकिस्तानच्या संघाने आपल्या बॉलर्सच्या जोरावर साऊथ आफ्रिकेचे नऊ गडी पॅव्हिलियन मध्ये पाठवले. मात्र साउथ आफ्रिकेने सोळा चेंडू शिल्लक असताना एक गडी राखत विजय मिळवला.

PAK vs SA Live Score: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट टीम कडून खेळत असताना सौद शकील याने 52 चेंडू मध्ये 52 धावा केल्या. तर बाबर आजमने 65 चेंडू मध्ये 50 धावा केल्या. पाकिस्तानकडून खेळत असलेला शालाब खान यांनी मात्र 36 चेंडू मध्ये 43 धावा करत पाकिस्तानची धावसंख्या बऱ्यापैकी उभारली. साऊथ आफ्रिकेच्या गोलंदाजांनी आज चांगली कामगिरी केली. त्यामध्ये तबरेज शम्सी याने 60 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. मार्को यान्सिन याने 3 विकेट्स घेत 43 धावा दिल्या. जेराल्ड कोएट्झी याने दोन विकेट घेत 42 धावा दिल्या ही कामगिरी त्याने 7 ओव्हर मध्ये केली.(pakistan बनाम south africa)

Pakistan vs South Africa Updates 2023 World Cup: साउथ आफ्रिकेकडून एडन मार्करम याने 93 चेंडू मध्ये 91 धावा केल्या. डेव्हिड मिलर याने 33 चेंडू मध्ये 29 धावा करत आऊट झाला. टेंबा बावुमा याने 27 चेंडू मध्ये 28 धावा केल्या. पाकिस्तानच्या बॉलर्सनी ही बऱ्यापैकी कामगिरी केली. यामध्ये शाहीन अफरीदीने 45 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. उसामा मीर यांनी देखील 45 धावा देत 2 विकेट घेतल्या. पाकचा खेळाडू मोहम्मद वासिम यांनी 50 धावा देत 2 विकेट घेतल्या.

पाकिस्तान बनाम दक्षिण अफ्रीका मॅचचा सामनावीर तबरेज शम्सी(SA) ठरला. 

24 वर्षानंतर साऊथ अफ्रिकेने रचला इतिहास

24 वर्षानंतर वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) पाकिस्तानचा पराभव करून साऊथ अफ्रिकेने इतिहास देखील रचला आहे.

गुण तालिकेत झाला मोठा बदल

आज झालेल्या साउथ अफ्रीका बनाम पाकिस्तान मॅच मुळे गुण तालिकेमध्ये मोठा बदल झालेला आहे. आजच्या मॅच मध्ये साउथ आफ्रिकेने विजय मिळवल्यामुळे त्यांचे गुण 10 झाले आहेत. भारतीय संघाचे गुण देखील 10 होते. त्यामुळे ह्या मॅच पूर्वी भारतीय संघ अव्वल स्थानावर होता. मात्र नेट रन रेट मुळे साउथ आफ्रिका आता अव्वल स्थानावर पोचले आहे. साऊथ आफ्रिकेचा नेट रन रेट +2.032 आहे. तर भारतीय क्रिकेट संघाचा नेट रन रेट +1.353 आहे.

भारताची पुढील मॅच कधी आहे?

इंडिया वस इंग्लंड ही मॅच 29 ऑक्टोबर रोजी लखनऊ येथे होणार आहे. इंडिया वस इंग्लैंड या मॅच मध्ये जर भारत जिंकला तर पुन्हा अव्वल स्थान गुणाच्या जोरावर अव्वल स्थान मिळवू शकतो.(cricket in marathi) भारत बनाम इंगलैंड मॅच दुपारी 2 वाजता चालू होणार आहे.
header ads

PAK vs SA Playing XI मध्ये कोण कोण होते?

पाकिस्‍तानचे प्‍लेइंग 11 - इमाम उल हक, अब्‍दुल्‍लाह शफीक, बाबर आजम (कप्‍तान), मोहम्‍मद रिजवान, सउद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्‍मद नवाज, शाहीन अफरीदी, मोहम्‍मद वसीम और हैरिस रउफ.

दक्षिण अफ्रीकाचे प्‍लेइंग 11 - टेंबा बावुमा (कप्‍तान), क्विंटन डी कॉक, रासी वान डर डुसैन, एडेन मार्करम, हेनरिच क्‍लासेन, डेविड मिलर, मार्को यानसेन, केशव महाराज, तबरेज शम्‍सी, गेराल्‍ड कोएत्‍जे और लुंगी एनगिडी.