पखाल हा शब्द मराठी भाषेत जास्त वापरला जात नाही त्यामुळे सहसा लोकांना या शब्दाचा समानार्थी शब्द माहीत नाहीत. चला आज जाणून घेऊया पखाल या शब्दाचा मराठी अर्थ आणि समानार्थी शब्द.
पखाल या मराठी शब्दाचा अर्थ पाणी वाहून नेण्यासाठी असलेली कातडी पिशवी असा होतो. पूर्वीच्या काळी आता जसे प्रत्येक घरी पाण्याची पाईप लाईन असतात तसे नसायचे. त्यावेळी पाणी वाहून नेण्यासाठी सोय व्हावी याकरिता लोक पखाल वापरत म्हणजे प्राण्याच्या कातद्यापासून बनवलेली मोठी पिशवी वापरली जायची. मात्र हे पाणी पिण्यायोग्य नसायचे.
पखाल या शब्दाला मराठी भाषेत पाखाल, मसक, मशक, पाणी वाहून नेण्याची पिशवी असे समानार्थी शब्द आहेत.