मराठी भाषेत पक्षी हा शब्द प्रचलित आहे. हवेत उडणारे पंख असलेले, चोच असलेले, उष्ण रक्त असलेले दोन पायाचे सजीव जे अंडज असतात. त्यांना पक्षी असे मराठी मध्ये म्हटले जाते.
पक्ष्यांचे रक्त उष्ण असते. तसेच त्यांना पंख असतात या पंखाचा उपयोगाने ते हवेमध्ये विहार करतात. त्यांना चालण्यासाठी आणि थांबण्यासाठी दोन पाय असतात. पक्षी हे अंडज असतात.
पक्षी या शब्दाला मराठी मध्ये बरेच समानार्थी शब्द आहेत. पाखरू हा शब्द महाराष्ट्रामध्ये जास्त प्रचलित आहे जो पक्षी या शब्दाला समानार्थी शब्द आहे. पक्षी या शब्दाला खग असाही समानार्थी शब्द आहे. विहंगम हा शब्द पाखरू या शब्दाला मराठी भाषेमध्ये समानार्थी शब्द आहे. विहंग/विहग हा शब्द पक्षी या शब्दाला समानार्थी शब्द मराठी मध्ये वापरला जातो.
हिंदी भाषेत पक्षी या शब्दाला पंछी असं म्हटलं जातं तर इंग्लिश मध्ये बर्ड (Bird)असा शब्द वापरला जातो.