Shikshak Bharati 2019: 2017 या वर्षी झालेल्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीनुसार पवित्र पोर्टल वर यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आणि मुलाखती शिवाय असे पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांसाठी मुलाखती शिवाय आणि मुलाखतीसहित पद भरती असा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थातील मुलाखतीसह पद भरतीसाठी कार्यवाही करण्यात आलेली होती.
शिक्षक भर्ती लेटेस्ट न्यूज़ 2023

2019 मध्ये शिक्षक भरतीच्या वेळी अपात्र, रुजू न झालेले, गैरहजर आणि माजी सैनिक उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे रिक्त जागांसाठी गुणवत्तेनुसार पात्र असलेल्या उमेदवारांमधून शिफारस करण्यासाठी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची माहिती संबंधित जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका यांनी भरलेली होती.

याआधी मुलाखतीसह पदभरती मध्ये खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाकडील इयत्ता पहिली ते पाचवी या गटासाठी रिक्त पदांचे जाहिरात असलेल्या पदांसाठी कार्यवाही करण्यात येत आहे. 1: 10 या मर्यादा मध्ये(समांतर आरक्षणासह व उमेदवार उपलब्धतेच्या मर्यादेत) मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी उमेदवार उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

मृणाल कुलकर्णींची शिवानी रांगोळेच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट; म्हणाली.... | वाचा सविस्तर :

जीवन मराठी यांनी वर पोस्ट केले सोमवार, ३० ऑक्टोबर, २०२३
 

मा उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद इथल्या याचिका क्रमांक 11081/2019 विचारात घेऊन त्या त्या समांतर आरक्षणाची शिल्लक पदे ही पात्र उमेदवार यांना उपलब्ध होण्यासाठी माजी सैनिक या समांतर आरक्षणातून उपलब्ध होणारी पदे त्या त्या समांतर आरक्षणात विचारात घेण्यात आलेली आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुज्ञा क्र. २०७४३/२०२१ व अन्य याचिकेतील आदेश दिनांक ११/०८/२०२३ रोजी दिलेल्या निर्णयानुसार ई १ ली ते ई ५ वी या गटातील रिक्त पदांबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. अपात्र, गैरहजर, रुजू न होणे इत्यादी कारणास्तव SEBC प्रवर्गातील रिक्त असलेल्या पदांसाठी EWS /खुला प्रवर्गासाठी विचारात घेण्यात आली आहेत.

शासन पत्र दिनांक १२/०६/२०२३ नुसार माजी सैनिक या प्रवर्गातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही अगोदर करण्यात येईल त्यानंतर १० टक्के रिक्त पदे वगळून उर्वरित रिक्त पदे त्या त्या प्रवर्गातील प्युअरमध्ये (समांतर आरक्षणाशिवाय) वर्ग करून कार्यवाही करण्यात येईल. यापूर्वी mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर PAVITRA- TEACHER RECRUITMENT २०१७ साठी स्व-प्रमाणपत्र पूर्ण केलेल्या उमेदवारांना या प्रक्रियेत सहभागी होता येईल व केवळ त्यांनाच लॉगीन उपलब्ध होईल.

उमेदवाराने लॉगीन केल्यावर Generate Preference या मेनूचा वापर करायचा आहे आणि प्राधान्यक्रम देण्याची यादी Generate करायचे आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत आपले प्राधान्यक्रम लॉक करायचे आहेत, उमेदवारांनी जर प्राधान्यक्रम Generate करून लॉक केले नाहीत तर उमेदवार पुढील प्रक्रियेसाठी त्यांना विचारात घेतले जाणार नाही. काही तांत्रिक कारणांमुळे जर उमेदवारांना त्यांनी नमूद केलेल्या पात्रतेनुसार सुसंगत नसलेले प्राधान्यक्रम Generate झाले असल्यास उमेदवारांनी असे प्राधान्यक्रम लॉक करू नयेत. जर उमेदवारांनी असे प्राधान्यक्रम लॉक केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील.

प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर प्राधान्यक्रमात बदल करावयाचा झाल्यास जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून विहित मुदतीत पुन्हा जनरेट करता येईल. उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यासाठी दिनांक 31/10/2023 to 3/11/2023 पर्यत मुदत देण्यात येत आहे. उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करत असताना अडचण आल्यास edupavitra@gmail.com या ईमेल वर संपर्क साधता येईल.