भारतीय कबड्डी संघाचा(Indian Kabaddi Team) महान खेळाडू पवन सेहरावत(Pawan Sehrawat) सध्या आनंदाच्या शिखरावर आहे. नुकत्याच चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत(Asian Games Gold Medal) त्याने कबड्डीमध्ये भारतासाठी सुवर्णपदक पटकावले.
त्यानंतर प्रो-कबड्डी स्पर्धेच्या आगामी हंगामासाठी झालेल्या लिलावात(Pro-Kabaddi Auction) तो सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. प्रो-कबड्डीच्या इतिहासातील तो सर्वात महागडा खेळाडू (Most Expensive Pro-Kabaddi Player) आहे. तेलुगू टायटन्सने (Telugu Titans) त्याला २.६ कोटी रुपये दिले आहेत.

पवन सेहरावतच्या चाहत्यांची संख्या देखील खूप मोठी आहे. भारतातच नाही तर जगातल्या सर्वोत्कृष्ट रेडर्सपैकी तो एक आहे. 2016 साली प्रो-कबड्डीच्या एका हंगामात 987 पॉईंटस् घेण्याचा विक्रम पवनने केला होता.
header ads

यावर्षीच्या हंगामामध्ये पवन ने आपल्या चपळाईने विरोधी संघात हाहाकार माजवला होता. प्रो-कबड्डीच्या सर्व हंगामांवर(Pro-Kabaddi History)  नजर टाकल्यास सर्वाधिक गुण मिळवणाऱ्यांच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आहे.