पेज हा शब्द मराठी भाषेमध्ये फार रूढ असून याचा अर्थ तांदूळ म्हणजेच भात शिजवल्यावर किंवा शिजवत असताना जे वर पाणी येते त्या पाण्यात भाताचे अंश मिसळतात. हे पाणी बाजूला काढले जाते. या भात मिश्रित पाण्याला मराठी भाषेत पेज असे संबोधले जाते.
हे पाणी म्हणजेच भाताचे पेज रुग्णाला पिण्यासाठी दिले जाते. कारण रुग्णाला दातांनी चावून खाण्याचा त्रास असेल तर हे पेज पिऊन त्याचे शरीर तग धरू शकते.
पेज या शब्दाला कण्हेरी, कांजी हे समानार्थी शब्द आहेत.
पेज या शब्दाचा उच्चार इंग्लिशमध्ये केल्यास त्याचा मराठी अर्थ पान असा होतो. हे पान वहीचे किंवा पुस्तकाचे असते.(डाळ तांदळाची पेज समानार्थी शब्द)