साखरेला मागील हंगामात चांगला दर मिळाला आहे, सोबत इथेनॉलपासूनही उत्पन्न कारखान्यांस मिळाले असून कारखानदारांनी केवळ FRP नुसार देयके दिली आहेत. अतिरिक्त उत्पन्नातील वाटा म्हणून प्रत्येक टनाला ४०० रूपये शेतकर्यांना देण्यात यावेत, अन्यथा कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशारा यावेळी माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री. राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला.
सांगलीतून या जन आक्रोश यात्रेची (Jan Akrosh yatra) सुरवात करण्यात आली. जन आक्रोश पदयात्रा वेगवेगळ्या कारखान्यावर जात आपली मागणी तेथील कारखानदारांना सांगणार आहे. २२ दिवसत ६०० किमी अंतर पादाक्रांत करण्यात येणार असून १ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथून निघालेल्या जनआक्रोश यात्रेचा कुंडल येथे मिलाफ होणार आहे. दत्त कारखाना येथून निघालेली शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पदयात्राही कुंडल(Kundal, Sangli) येथे येणार आहे. सांगलीमधून जनआक्रोश पदयात्रा जिल्हाध्यक्ष महेश खराडे(Mahesh Kharade) यांच्या नेतृत्वाखाली आरग, कवठेमहांकाळ, उदगिरी, सोनहिरा, तासगाव, विटा या कारखान्यावरून कुंडल येथे येणार एकत्रित येउन राजारामबापू, क्रांती आणि हुतात्मा कारखान्यावर जाणार आहेत. जयसिंगपूर(Jaysingpur) येथील उस परिषदेत या जन आक्रोश पदयात्रेची सांगता 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
कोण आहेत राजू शेट्टी?
राजू शेट्टी हे भारतीय राजकारणी आणि शेतकरी नेते आहेत. ते शेतकऱ्यांच्या चळवळीशी संबंधित होते आणि भारतातील माजी संसद सदस्य (MP) आहेत. महाराष्ट्रातील शेतकर्यांचे (Shetkari Andolan) हक्क आणि कल्याणासाठी ते प्रसिद्ध आहेत.