putin news today live
मिळालेल्या माहितीनुसार टेलिग्राम चॅनेल जनरल एसव्हीआर, नियमितपणे रशियन राष्ट्राध्यक्षांच्या आरोग्यावर भाष्य करत असते आणि पुतीन आजारी असे सांगितले जाते. अलीकडच्या परदेश दौऱ्यांमध्ये हुकूमशहा बॉडी डबल्स वापरत असल्याचा दावाही या चॅनेलवर करण्यात आला होता.
"मॉस्कोच्या वेळेनुसार रात्री 9 च्या सुमारास, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानी कामावर असलेल्या सुरक्षा अधिकार्यांनी त्यांच्या खोलीतून आवाज आणि पडण्याचा आवाज ऐकला," असे जनरल एसव्हीआर ने सांगितले आहे.
रिपोर्ट मध्ये असे सांगितले आहे की, "2 सुरक्षा अधिकारी ताबडतोब राष्ट्राध्यक्षांच्या बेडरूममध्ये गेले त्यावेळी पुतिन बेडच्या जवळ जमिनीवर पडलेले दिसले. तर शेजारी असलेले टेबलही पडले होते. असे म्हंटले जात आहे की जेव्हा पुतीन पडले तेव्हा त्यांनी टेबलचा आधार घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आवाज आला. निवासस्थानी ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांना ताबडतोब बोलवण्यात आले.
"
Vladimir Putin News Today: पुतिन यांच्या तब्येतीच्या वाढत्या अटकळा आणि कथित हत्येचा कट उधळून लावल्याच्या बातम्यांदरम्यान हा रिपोर्ट आला आहे.(vladimir putin death) जनरल SVR हे माजी रशियन लेफ्टनंट जनरल चालवतात. रशियन राष्ट्राध्यक्षांनी बॉडी डबल्स वापरल्याच्या चॅनलच्या दाव्यालाही पुष्टी मिळालेली नाही.
(putin dead?)