साखरपुडा समानार्थी शब्द मराठी | Sakharpuda synonyms in Marathi

साखरपुडा हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित आहे. विवाह करण्यापूर्वी साखरपुडा हा विधी केला जातो. या विधीद्वारे विवाह निश्चित केला जातो. पत्रिका जुळल्यावर नवरा आणि नवरीची एकमेकांना पसंती झाल्यावर लग्न पक्के करण्यासाठी साखरपुडा हा विधी करण्यात येतो. पूर्वी या विधीला महत्त्व नव्हते मात्र धार्मिक विधी आणि मंत्र अस्तित्वात आहेत.

काही ठिकाणी साखरपुडा विधी वेळी लग्नाच्या याद्या देखील केल्या जातात. तसेच नवऱ्याचे आई वडील  मुलीला कुंकू लावून नारळ आणि साडी चोळी देतो. आणि तोंड गोड करण्यासाठी साखर दिली जाते. त्यामुळे या विधीला साखरपुडा असे नाव ठेवण्यात आले आहे.

अलीकडे साखरपुडा या विधीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. आत्ता साखरपुडा करत असताना साडी चोळी नारळ सोबतच अंगठी देखील घालायची प्रथा आली आहे. लग्न लवकर करायची नसेल तर साखरपुडा करून ठेवतात.

साखरपुडा या शब्दासाठी मराठी मध्ये समानार्थी शब्द वाङनिश्चय असा आहे.