शेअर्स माहिती मराठी | Shares Information Marathi
छोटा व्यवसाय उभा करण्यासाठी लागणारे भांडवल ही एखादी एक दोन व्यक्ती मिळून गुंतवू शकतात. मात्र ज्यावेळी मध्यम स्वरूपाचा उभा करायचा म्हटल्यास एवढा पैसा भांडवल आणायचा कुठून? असा प्रश्न उभा राहतो. त्यावेळी असा व्यवसाय उभा करण्यासाठी लागणारे भांडवल हे भागीदारी पद्धतीने उभे केले जाते. मात्र मोठा व्यवसाय, उद्योग, कारखाने उभे करायचे म्हटल्यास लागणारे भांडवल भागीदारी पद्धतीने उभ करता येत नाही. अशावेळी व्यक्तींचा गट किंवा काही व्यक्ती एकत्र येतात आणि कंपन्या स्थापन करतात. अशा व्यक्तींना त्या कंपनीचे प्रवर्तक म्हणजेच प्रमोटर्स असं म्हटलं जातं.
शेअर म्हणजे काय? What is a share?
1956 च्या कंपनी कायद्यान्वये शेअरची व्याख्या 'कंपनीच्या भांडवलामधील एक भाग म्हणजे शेअर' अशी आहे
भाग भांडवल म्हणजे काय? What is share capital?
शेअर द्वारे उभारण्यात आलेल्या भांडवलास भाग भांडवल म्हटले जाते.
भागधारक म्हणजे काय? What is a shareholder?
एखाद्या व्यक्तीने कंपनीचे एक किंवा त्यापेक्षा अधिक शेअर विकत घेते किंवा मालकी घेते त्याला भागधारक असे म्हटले जाते. भागधारक म्हणजेच शेअर होल्डर कंपनीचा मालक असतो.
दर्शनी किंमत म्हणजे काय? What is face value?
शेअरच्या सर्टिफिकेटवर जी छापील किंमत देण्यात आलेली असते त्याला त्या शेअरची दर्शनी किंमत म्हटले जाते.
लाभांश म्हणजे काय?What is dividend?
प्रत्येक शेअरवर किंवा भागावर भागधारकाला मिळणारा एकूण नफ्याचा वाटा म्हणजे लाभांश होय.
शेअर विकत घेण्याचे फायदे काय आहेत? What are the benefits of buying shares?
शेअर मध्ये गुंतवणूक केल्यास भांडवलमध्ये वाढ होते. शेअर होल्डरला बोनस शेअर मिळू शकतात. शेअर होल्डर ला शेअर्सवर करमुक्त लाभांश मिळतो. सवलतीच्या दराने भागधारकास हक्क भाग मिळतात.
शेअरचे प्रमुख दोन प्रकार पडतात.
1. प्रेफरन्स शेअर्स याला मराठीमध्ये अग्रहक्काचे शेअर्स असे म्हणतात.
2. इक्विटी शेअर्स याला मराठीमध्ये समभाग असे म्हणतात. त्याला दुसरा शब्द सर्वसाधारण शेअर्स असा आहे ज्याला इंग्लिश मध्ये ऑर्डनरी शेअर्स म्हणतात.
प्रेफरन्स शेअर्समध्ये म्हणजेच अग्रहक्काच्या शेअर्समध्ये एकूण आठ प्रकारचे शेअर्स असतात.
1. संचित अग्रहक्काचे शेअर
याला इंग्लिशमध्ये कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स असे म्हणतात. यामध्ये कंपनीला नफा कमी झाल्यास अथवा तोटा झाल्यास अग्रहक्क भागधारकांना त्यावर्षी लाभांश दिला जात नाही तर त्या बदल्यात पुढील वर्षीच्या लाभांश मध्ये तो ऍड केला जातो. आणि ज्यावेळी कंपनीला नफा होतो त्यावेळी हा संचित लाभांश भागधारकांना अग्रहक्काने दिला जातो. म्हणून याला संचित अग्रहक्काचे शेअर्स (Cumulative Preference Share) असे म्हणतात.
2. असंचित अग्रहक्काचे शेअर
याला इंग्लिशमध्ये नॉन - कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स असे म्हणतात. यामध्ये या आधी न दिलेला लाभांश शेअरवर संचित होत नाही. त्यामुळे अश्या शेअर्स ला असंचित अग्रहक्काचे शेअर (Non - Cumulative Preference Share) असे म्हटले जाते.
3. परतीचे अग्रहक्काचे शेअर्स
याला इंग्लिशमध्ये रिसेमाबल प्रेफरन्स शेअर्स असे म्हणतात. यामध्ये शेअर्स मुदतीनंतर किंवा निश्चित केलेल्या नियमानुसार भागधारकांना परत करावे लागतात. म्हणून याला परतीचे अग्रहक्काचे शेअर्स (Receemable Preference Shares) असे म्हटले जाते.
4. विना परतीचे अग्रहक्काचे शेअर्स
याला इंग्लिशमध्ये इररिसेमाबल प्रेफरन्स शेअर्स असे म्हणतात. यामध्ये शेअर्स कंपनी बंद झाल्यावर भागधारकांना त्याची रक्कम दिली जाते. म्हणून या शेअर्सला विना परतीचे अग्रहक्काचे शेअर्स (irreceemable Preference Shares) असे म्हणतात.
5. सहभागी अग्रहक्काचे शेअर्स
याला इंग्लिशमध्ये पार्टिसिपिंग प्रेफरन्स शेअर्स असे म्हटले जाते. यामध्ये भागधारकांना त्यांना ठरवून दिलेल्या दरा व्यतिरिक्त इक्विटी शेअर होल्डर्स ला मिळणाऱ्या जास्तीत जास्त दराप्रमाणे जादाचा लाभांश दिला जातो. म्हणून याला सहभागी अग्रहक्काचे शेअर्स (participating preference shares) असे म्हणतात.
6. असहभागी अग्रहक्काचे शेअर्स
याला इंग्लिशमध्ये नॉन - पार्टिसिपिंग प्रेफरन्स शेअर्स असे म्हटले जाते. यामध्ये भागधारकांना अतिरिक्त नफ्यामध्ये इक्विटी शेअर होल्डर्स सोबत ही साथ दिला जात नाही. म्हणून याला असहभागी अग्रहक्काचे शेअर्स (nonparticipating preference shares) असे म्हणतात.
7. रूपांतरित अग्रहक्काचे शेअर्स
याला इंग्लिशमध्ये कन्व्हर्टबल प्रेफरन्स शेअर्स असे म्हटले जाते. यामध्ये भागधारकांच्या इच्छेनुसार सर्वसाधारण शेअर्समध्ये ज्या शेअर्सचे रूपांतरण केले जाते त्याला रूपांतरित अग्रहक्काचे शेअर्स (convertible preference shares) असे म्हणतात.
8. अरूपांतरित अग्रहक्काचे शेअर्स
याला इंग्लिशमध्ये नॉनकन्व्हर्टबल प्रेफरन्स शेअर्स असे म्हटले जाते. यामध्ये शेअर्स सर्वसाधारण शेअर्स मध्ये रूपांतरण केले जात नाहीत म्हणून अरूपांतरित अग्रहक्काचे शेअर्स (nonconvertible preference shares) असे म्हटले जाते.
इक्विटी शेअर्स किंवा समभाग म्हणजेच सर्वसाधारण शेअर्स म्हणजे काय?
समभाग शेअर्स मध्ये किंवा सर्वसाधारण शेअर्स मध्ये भागधारकाला लाभांश किंवा भांडवल परत मिळण्याच्या बाबतीमध्ये अग्रहक्क मिळत नाही. अग्रहक्क शेअर्स होल्डर्सना लाभांश दिल्यावर या शेअर धारकांना लाभांश देण्यात येतो. यामध्ये देण्यात येणारा लाभांश हा कंपनीला जसा नफा होतो तसा बदलतो आणि संचालक बोर्डाच्या शिफारशीनुसार हा लाभांश देण्यात येतो.
ज्यावेळी कंपनी बंद होते त्यावेळी देखील अशा भागधारकांना सगळ्यात शेवटी त्यांचे भाग भांडवल दिले जाते.
शेअर बद्दल शेअर मार्केट बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वरून पुस्तक खरेदी करू शकता या पुस्तकांमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळू शकते.
1. मार्केट, शेअर बाजार - शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्याची 41 सूत्रं - विकत घ्या
2. शेअर मार्केट आणि स्पेक्युलेशन विकत घ्या
3. शेअर मार्केट शेअर बाजार - शेअर बाजारातून पैसे कसे कमवावे? विकत घ्या
शेअर मार्केट म्हणजेच भरपूर पैसा (शुध्द मराठी भाषेत) विकत घ्या